अभिनेते प्रशांत दामले, अशोक हांडे यांच्या उपस्थिती रोटरी पुरस्काराचे नाशिकला वितरण

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘नाशिक भूषण २०२३’ पुरस्कार सानाजिक, साहित्य आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या फ्रेंड्स सर्कलचे संचालक जयप्रकाश जातेगावकर तर रोटरी भूषण पुरस्कार डी. विजय फार्माचे संचालक विजय दिनानी आणि प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट उदयराज पटवर्धन यांना नुकताच जाहीर करण्यात आला होता. आज बुधवारी (दि. २१) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध नाट्य अभिनेते तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यास नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष, सीए प्रफुल बरडीया, सचिव ओमप्रकाश रावत, नाशिक भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत पारख, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आदींनी केले आहे.