शिधापत्रिका ई – केवायसी साठी मुदत वाढवा – ग्राहक पंचायतीचे तहसीलदारांना निवेदन
अकोले /प्रतिनिधि
आदिवासी तालुक्यातील (स्
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पर्यटनासाठी स्थानिकांना पर्यटनकर न आकरण्याबाबतचे व रेशन कार्डधारकांना ई- केवायसी करण्यासाठी मुदत वाढ मिळण्याचे निवेदन तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे यांना ग्राहक पंचायत च्या अकोले शाखेने दिले
अकोले तालुक्यातील प्रसिध्द पर्यटन स्थळे वन विभाग व पर्यटन विभागाने जागोजागी टोलनाके टाकून पावती फाडतात . पावती घेऊ नये असा आमचा होरा नाही मात्र स्थानिक तालुक्यातील पर्यटकांकडून जबरदस्तीने पावती फाडून अरेरावी करून पावती फाडली जाते. ती पावती स्थानिक अकोले तालुक्यातील लोकांकडून घेऊ नये अशी तमाम अकोले करांची मागणी आहे अन्यथा १५ ऑगस्ट २०२४ रोजी कचेरीसमोर उपोषण व आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच अकोले हा आदिवासी तालुका असुन रेशनकार्ड मधील कुटुंबाचे नावे ई – के वाय सी वेबसाईट (रेंज) व सर्वर डाउन होते त्यामुळे अनेक वृध्द, दिव्यांग रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक , महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत असल्यामुळे पुरवठा विभागाने दिलेली शेवटची तारीख ३०/६/२०२४ असून दोन ते तीन महिन्याची मुदवाढ मिळण्यास निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ व जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसिलदार अकोले, यांना दिल्या आहेत. निवेनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शाखा अकोले, मच्छिंद्र मंडलिक, महेश नवले, दत्ता शेनकर, रमेश राक्षे, राम रूद्रे, रामदास पांडे, नरेंद्र देशमुख, दत्ता ताजणे, भाऊसाहेब नाईकवाडी, माधवराव तिटमे , गणेश कानावडे, भगवान करवर, सचिन खरात, बाळासाहेब नवले, प्रमोद धराडे, ज्ञानेश पुंडे, कैलास तळेकर, पांडुरंग पवार, ॲड दिपक शेटे, सुनिल देशमुख, भाऊसाहेब वाळुंज, रामहारी तिकांडे, नवनाथ आवारी, प्रमोद मंडलिक आदिंची नावे आहेत.