पारनेर तालुक्यातील ढगेवाडी येथील जळीत दुर्घटना, निलेश लंके व नवसंजीवनी महिला संस्थेची मदत !

जळीत झालेल्या डोंगरे कुटूंबाला आर्थिक मदत करा सरपंच प्रकाश गाजरे
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या पळसपुर ढगेवाडी येथील दुर्गम भागात राहणारे अल्पभूधारक गरीब शेतकरी असणारे कैलास नामदेव डोंगरे हे घरी नसताना दोन जून रोजी घराला आग लागली . त्यांचा मोडका तोडका असणारा गरिबीचा संसार काही क्षणात बेचिराख झाला .ज्यावेळेस डोंगरे परिवार आपला रोजगार उरकून घरी आले असता ते भयानक दृष्य पाहून टाहो फोडून आपल्या उध्वस्त झालेल्या भविष्याकडे पाहू लागले त्यावेळी गावकऱ्यांनाही अश्रू आवरता आले नाही.
कैलास डोंगरे या सामान्य रोजगार करणाऱ्या शेतकऱ्या पाठीमागे दोन छोटी मुले व एक मुलगी असा परिवार आहे .झालेल्या जळीतामध्ये सर्व संसार उपयोगी साहित्यासह रेशनकार्ड , आधार कार्ड व रोजगार करून मिळविलेली थोडीशी रक्कमही या जळीतामध्ये जळून खाक झाली .उध्वस्त झालेल्या कुटुंबाला ढगेवाडी ग्रामस्थांनी अन्न धान्य देत उघड्यावर आलेल्या संसाराला आल्पशी मदत केली .
निलेश लंके महिला कल्याणकारी संस्था व नव संजीवनी संयुक्त महिला संस्थेच्या माध्यमातून गेले काही वर्षात अनेक वंचित व आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबांना मदत असो की, कोरोना काळात शेकडो कुटुंबाला पुरविलेले रेशन असो की,शेकडो गरीब कुटुंबांना मोफत घरकुल आसो .अशा प्रकारची मदत निलेश लंके महिला कल्याणकारी संस्था व नव संजीवनी संयुक्त महिला संस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य करणारे संस्थेच्या अध्यक्षा , सौ.सविता ढवळे यांनी या जळीत कुटुंबातील परिवाराची दखल घेत .त्यांना सर्व संसार उपयोगी साहित्य देत तसेच उध्वस्त झालेले घर सावरण्यासाठी पत्र्याचे छत संस्थेमार्फत देणार असे सांगत त्यांच्या मोडक्या प्रपंचाला आधार दिला .
टाकळी ढोकेश्वर गटातील सामाजिक कार्यकर्ते तथा म्हसोबाझापचे विद्यमान सरपंच प्रकाश गाजरे यांनी सदर कुटुंबाची भेट घेत समाज माध्यमांद्वारे व स्वतःही या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून देईल असा शब्द देत.स्वतःचा फोन पे . अकाउंटचा नंबर 9850912298 वर स्वइच्छेने सदर कुटुंबाला आर्थिक मदत करावी आसी साद घालत थोड्याच दिवसात हे उध्वस्त झालेले कुटुंब पूर्ववत करण्यासाठी इतर संस्था, प्रशासकीय अधिकारी , मित्रपरिवार , व ग्रामस्थांनी ही आर्थिक मदत करत या कुटुंबाचा जीर्णोद्धार करावा असे आवाहनही यावेळी सरपंच प्रकाश गाजरे यांनी केले.