इतर

शेवंगावात दरोडयाच्या घटनेचा निषेधसाठी माहेश्वरीच्या वतीने मुक मोर्चा


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

शेवगावच्या मध्य वस्तीतील मारवाडी गल्लीतील आडत व्यापारी, तथा माहेश्वरी सभेच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या राहत्या घरी झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेत त्यांच्या आई श्रीमती पुष्पाताई बलदवा व चुलते गोपिकिसन बलदवा या दोघाची चोरट्यानी निघृण हत्या केली. तसेच त्यांची चुलती श्रीमती सुनिता यांना जबर जखमी केले. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे . या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा माहेश्वरी सभा व समस्त ग्रामस्थाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर आज शनिवारी शिस्तबद्ध मुक मोर्चा काढण्यात आला .
शहरातील बालाजी मंदिरापासून निघालेला हा मुक मोर्चा मुख्य बाजार पेठ मार्गे तहसील कार्यालयावर आल्या नंतर तेथे पार पडलेल्या निषेध सभेत शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे, परतूरचे माजी आमदार सुरेश जेठलीया, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस प्रतापकाका ढाकणे,शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, संजय कोळगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माहेश्वरी सभेचे प्रदेश अध्यक्ष मधुसुदन गांधी, सचिव सत्यनारायण सारडा , महेश सोमाणी, नाशिकचे उमेश मुंदडा, माहेश्वरी सभेच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण डागा, तिर्थपुरीच्या राधिका झंवर, आंदिनी या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करून पोलिस प्रशासनाने या घटनेचा तातडीने शोध लावावा. तसेच जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून गुन्ह्याचा निकाल लावावा . जेणे करून पुढील काळात अशा प्रकारचे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशी
कडक शिक्षा व्हावी.तसेच या घटनेची उच्च स्तरीय तपास यंत्रणेमार्फत तपास करण्याची मागणी केली .
माहेश्वरी समाज शांतता प्रिय असून तो ठराविक चाकोरी बाहेर कधीही जात नाही . मात्र अनेकदा समाज कंटकाकडून समाजातील निरपराध लोकांना लक्ष करण्यात येते . शेवगावातील बलदवा कुटूंबावर झालेला हा आघात राज्यातील तमाम समाज बांधवावर झालेला आहे . केवळ माहेश्वरी समाजच नव्हे तर शेवगावातील तमाम जनतेला दहशतीतून बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने आपले कसब दाखविण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली .
यावेळी राज्यभरातील माहेश्वरी सभेचे पदाधिकारी, तसेच पाथर्डी, नेवासा, संगमनेर, आकोले ,पैठण, सभाजी नगर, जालना, परभणी, पुणे, नाशिक आदि ठिकाणचे समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती .
माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनेष बाहेती, यांनी सुत्रसंचलन केले . तर तालुकाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिहाणी यांनी आभार मानले . संघटनेच्या वतीने दिलेले निवेदन प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार रविंद्र सानप यांनी स्विकारले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, परिक्षाविधिन आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button