पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव!
.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवासोबत राज्यस्तर पुरस्कार, विद्यार्थी दत्तक, विनामूल्य इंग्लिश कोर्स..
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नुकतेच १० वी आणि १२ वी बोर्ड परिक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या पद्मशाली समाजातील विद्यार्थ्यांचा वह्या देऊन कौतुक करण्यात येणार आहे. त्यासाठी पद्मशाली समाजातील विद्यार्थी आणि पालकांनी गुणपत्रिकेची छायाप्रत (झेरॉक्स) सोलापूरातील मार्कंडेय रुग्णालय जवळील साई दरबार शेजारील ‘वर्षा रबर स्टॅम्प’ येथे शुक्रवार दि. ३० जून पर्यंत आणून द्यावेत. ‘राज्यस्तरीय पुरस्कार’ – ‘विद्यार्थी दत्तक’ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी यंदाच्या वर्षापासून दहावी बोर्ड परिक्षेत प्रथम क्रमांक येणा-या पद्मशाली समाजातील विद्यार्थ्याला राज्यस्तरीय पुरस्कार ‘पद्मएकलव्य’, विद्यार्थ्यांनीस ‘पद्मज्योती’ देऊन गौरविण्यात येईल. तसेच प्रथम क्रमांक येऊनही आर्थिक अडचणी भेडसावणा-या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनीला ११ वी – १२ वीसाठी ‘शैक्षणिक दत्तक’ म्हणून घेतले जाईल. यासाठी सोलापूरातील सराफ व्यापारी सुरेश जनार्दन बिटला तर्फे ‘पुरस्कार व विद्यार्थी दत्तक’साठी योगदान देत आहेत. सारथी इंग्लिश स्पीकर्स क्लब तर्फे प्रथम ३ विद्यार्थ्यांना विनामूल्य कोर्स – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दहावीत प्रथम,द्वितीय तृतीय क्रमांक येणा-या पद्मशाली समाजातील ३ विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा रेग्युलर कोर्स आणि १ वर्षाकरिता सदस्यपदी विनामूल्य प्रा. विठ्ठल वंगा सर यांचे सारथी स्पोकन इंग्लिश व सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबच्या वतीने देण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा आणि फौंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी दिले आहे.
हा कार्यक्रम आदर्श नगर येथील लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या बुर्ला मंगल कार्यालयात शनिवार दि. १ जुलै रोजी संध्याकाळी ठीक ४ वाजता सुरवात होईल. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी येणार असून बहुमुल्य मार्गदर्शन करणार आहेत, तरी अधिकाधिक विद्यार्थी सहभाग नोदवावा, असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, नागेश सरगम, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी यांनी केले आहे.