आषाढी एकादशीच्या दिवशी प्राणीमात्रांची हत्या थांबवा

कोतुळ प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या दिवशी प्राणीमात्रांची हत्या थांबवा अशी मागणी एका निवेदना द्वारे कोतूळ मधील नागरिकानीं केली आहे.या बाबत कोतुळ ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की गुरुवार दि.२९ जून २०२३ रोजी हिंदू धर्मियांची आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत आहेत. महाराष्ट्रात भागवत संप्रदयातील वारक-यांच्या व हिंदू बांधव, माता भगिनी यांच्या दृष्टीने आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. त्यादिवशी कोतूळ ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारे प्राणीमात्रांची हत्या होणार नाही व कोतूळ गावातील एकोपा व जातीय सलोखा कायम राहील यासाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्राणी संरक्षण कायदा सन १९७६ (सुधारित १९९५) नुसार गो वंशाची हत्या करणे हा गुन्हा आहे. तसेच प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंध या १९६० च्या कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र अशा काही घटना कोतूळ ग्रामपंचायत हद्दीत घडत आहे व याबाबत वृत्तपत्रांत बातम्यादेखील छापून आलेल्या आहेत. याची दखल घेऊन ग्रामपंचायत स्तरावर योग्य ती खबरदारी घेऊन उचित कार्यवाही करावी. गावातील व परिसरातील शांतता व एकात्मता, अखंडता व बंधूभाव कायम राहील यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाचा स्वीकार कोतुळ ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय देशमुख व सहाय्यक फौजदार गुंजाळ यांनी केला या वेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर घोलप विजय देसाई सुनील देशमुख विजय तोरकडे विशाल बोऱ्हाडे, विकी नेवासकर,दत्ता बोऱ्हाडे,हे उपस्थित होते.

या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य हेमंत देशमुख, डॉ. गुंजाळ, भाऊसाहेब पवार, विजय नेवासकर संतोष नेवासकर, रवींद्र घाटकर,किशोर आरोटे,सुनील देशमुख, यांच्यासह सत्तर ग्रामस्थांच्या सह्या आहेत