माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या विविध योजना सभासदांना उपयुक्त-प्रा.भाऊसाहेब कचरे

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा
अकोले /प्रतिनिधी
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या विविध योजना सभासदांच्या हितासाठी राबविल्या जात असून राज्यातील सर्वच जाणकारांना संस्थेचे व्याजदर, ठेवी , योजना बाबत नवल वाटत आहे.त्यामुळेच संस्था कौतुकास पात्र ठरत असल्याचे समाधान वाटते आहे. सर्व सभासदांच्या विश्वासावर आम्ही सर्व संचालक मंडळ काम करत असून सेवा निवृत्तीनंतर सुध्दा सभासदांचे ऋणानुबंध कायम राहावेत यासाठी कृतज्ञता निधी देऊन त्यांचा गौरव करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे यांनी केले.
अहमदनगर डिस्ट्रिकट सेकंडरी टीचर्स को.ऑप.क्रेडिट सोसायटी च्या शाखा अकोलेच्या वतीने संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा व गुणवंत पाल्यांचा सन्मान रोटरी क्लब चे संस्थापक अध्यक्ष व दैनिक सार्वमत चे उपसंपादक अमोल वैद्य , महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
जिल्हा सहकारी बँकेच्या अकोले येथील स्व .भाऊसाहेब हांडे सभागृहात हा सोहळा पार पडला.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक तथा जेष्ठ संचालक प्रा भाऊसाहेब कचरे बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी चेअरमन भास्करराव कानवडे होते. यावेळी संचालक चांगदेव खेमनर ,कैलास रहाणे, सुनिल वाळुंज, सुनिल धुमाळ, भिमाशंकर तोरमल , शिवाजी चासकर, विठ्ठल म्हशाळ,रावसाहेब शेळके,शांताराम धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी कोविड मुळे निधन झालेले सभासद व संस्थेचे व्हॉईस चेअरमन अण्णासाहेब ढगे यांचे वडिल कै रामभाऊ ढगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
अमोल वैद्य यांनी संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त सभासदांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे व पाल्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्याचा उपक्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संस्थेचे नियोजन आर्थिक बाबतीत शिस्तीचे असल्याचे सांगत सर्वांना बरोबर घेऊन जाणारे प्रा कचरे यांचे नेतृत्व असून संस्थेला अधिक गतिमान करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल असे त्यांनी सांगितले.
विश्वासराव आरोटे यांनी संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केल्याने समाधान व्यक्त करत भविष्यात आपणही आपल्या सोबत अशा उपक्रमात सहभागी होऊ असे सांगितले.शिक्षकांमुळे आपण जीवनात इथपर्यंत पोहचल्याची नम्र भावना त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात भास्करराव कानवडे यांनी संस्थेच्या कोविड काळातील योगदानाबद्दल कौतुक करून आपण खरी माणुसकी जपली असल्याचे सांगितले.
यावेळी अकोले नगरपंचायती च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. शितल वैद्य , सौ प्रतिभा मनकर यांचा संस्थेचे सभासद असल्याने यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य आबासाहेब निकम , प्रा.अरुण पवार यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुभाष चासकर यांनी केले. तर सूत्रसंचालन सतीश पाचपुते यांनी करून विद्यमान संचालक अनिल गायकर यांनी आभार मानले .