रंगोत्सव सेलिब्रेशन कला स्पर्धेत ६ वी ची विद्यार्थीनी भारतात प्रथम

निलम दाते-आंधळे पाटील
मुंबई ..सोमवार दि.26 जून 2023 रोजी संजीवनी वर्ल्ड स्कूल , दहिसर पूर्व मुंबई या शाळेतील विद्यार्थिनी जान्हवी मिस्त्री या सहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे होणाऱ्या इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशनमध्ये स्केचिंग स्पर्धेत 20 ग्रॅमचे सुवर्णपदक जिंकून भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे .
फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या या कला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पन्नास हजार विद्यार्थ्यांमधून जान्हवी ही भारतात प्रथम आली आहे ही स्पर्धा भारतात तसेच भारताबाहेरील विविध देशात घेण्यात आली होती. सुवर्णपदक स्वीकारल्यानंतर जान्हवी व तिच्या आई वडिलांनी भावुक होऊन रंगोत्सव सेलिब्रेशन तसेच शाळेचे शिक्षक , मुख्याध्यापक, ट्रस्टी या सर्वांचेच आभार व्यक्त केले.रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल आर्ट कॉम्पिटीशन मागील ११ वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्यू.केजी ते १२ वी पर्यंत कला क्षेत्रात विविध विषयांवर स्पर्धा आयोजित करते.
या स्पर्धेमुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता वाढते आणि त्यांचा अमूल्य वेळ हा त्यांच्या स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च होतो.
या स्पर्धेमध्ये मुले रंगकाम, हस्ताक्षर, कोलाज, कार्टून मेकिंग, फिंगर आणि थंब पेंटिंग, टॅटू मेकिंग, फोटोग्राफी, स्केचिंग, ग्रीटिंग कार्ड मेकिंग या विषयावर दरवर्षी सहभाग घेतात. या स्पर्धेचे महत्व म्हणजे नॅशनल लेव्हल विजेते स्पर्धकांना इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड केली जाते.
अद्याप पर्यंत अश्या प्रकारच्या शालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थांसाठी २२ कॅरेटचे गोल्ड मेडल देण्यात येणारी रंगोत्सव सेलिब्रेशन ही एकमेव स्पर्धा परीक्षा आहे. या वर्षी महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांमधे दोन गोल्ड मेडल देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसही देण्यात आले.
रंगोत्सव सेलिब्रेशनचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामजी दाते यावेळी सहभागी होणाऱ्या सर्वच शाळांचे कौतुक करत आभार मानले व कु.जान्हवीला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.संजीवनी वर्ल्ड स्कूल, दहिसर येथे अतिशय सुंदर अशा नियोजनात सर्व शिक्षकांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.