शासन परीपत्रकानुसार दर आकारूनच ग्राहकास पावती द्या तहसीलदारांचे सेतू चालकांना आदेश

अकोले /प्रतिनिधी
शासन परीपत्रकानुसार दर आकारणी करुनच ग्राहकास पावती देण्यात यावी. तसेच ग्राहकांडुन कागदपत्राची पुर्तता करुन सदरचा अर्ज ऑनलाईन करुन शासन परीपत्रकानुसार ग्राहकास पोहच देण्यात यावी. असे आदेश अकोल्याचे तहसीलदार सतीश थिटे यांनी अकोले तालुक्यातील सर्व सेतू चालकांना दिले आहेत
ग्राहक पंचायत च्या वतीने श्री मच्छिंद्र मंडलिक यांनी निवेदन दिले होते सन २०२३-२०२४ चे शैक्षणिक वर्ष चालू झाले असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्नाचे, जातीचे, रहिवासी, डोमेसाईल, नॉन- क्रिमिलिअर , आर्थिक दुर्लभ घटक, प्रकल्पग्रस्त, इत्यादी दाखले.
तसेच एखाद्या विद्यार्थ्याने मागिल वर्षी गॅप घेतला असेल तर, तर त्यास आता नविन प्रवेशासाठी ‘गॅप’ सर्टिफिकेट देणे बंधनकारक असते असे अनेक प्रकारचे दाखल्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना अनेक चकरा मारूनही दाखले वेळेत मिळत नाहीत. अकोले तालुक्यातील सेतु चालक पालकांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना सांगताकी ‘सर्व्हर डाऊन’ असल्याचे एकमेव कारण देत विद्यार्थी पालकांना दररोज कार्यालयात ‘ हेलपाटे’ मारण्यास भाग पाडले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी अडचणी येत आहेत.
अकोले तालुक्यातील विस्तार मोठा असून लांबून यावे लागते आज नाही तर उद्या दाखले मिळतील या आशेने विद्यार्थी व पालक, सेतु चालकाचे, तहसिल कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र जो दिवस उजाडेल तो ‘नाहीचा पाढा’ वाचूनच दाखले झाले नाही, ‘सर्व्हर डाऊन आहे’ . सर्व्हरला पर्याय काढा विद्यार्थ्यांना दाखले द्या शैक्षणिक नुसकान झाले नाही पाहिजे.
महसूल व वन विभाग पदभरती साठी ही विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वेळेत मिळाले पाहिजे. सेतु चालकांनी शासन परीपत्रकानुसार दाखल्याचे पैसे घ्यावेत व त्या पावतीवर दराचा उल्लेख असावा असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, सह जिल्हा सचिव रमेश राक्षे, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, सचिव राम रुद्रे, धनंजय संत, मच्छिंद्र चौधरी, दत्ता ताजणे, लक्ष्मण करवर, सखाहारी पांडे, भाऊसाहेब वाकचौरे,आदिंच्या सह्या आहेत.

अकोले तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळावेत व सेतू चालकांकडून होणारी ग्राहकांची आर्थिक लूट थांबवावी असे याचे निवेदन ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपाचे तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक यांनी तहसीलदारांना दिले होते त्यावर तहसीलदार यांनी तात्काळ कार्यवाही केली आहे