इतर
टाकळी ढोकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांना आत्याधुनिक सोयी सुविधा

आरोग्य विभागासह रुग्ण कल्याण समितीचा पुढाकार,
पारनेर – प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरातील २५ ते ३० गावातील आदिवासी दुर्गम भागातील गर्भवती महिलांना यापुढील काळात आत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. ग्रामीण भागातील अनेक गर्भवती महिलांना प्रमुख तपासण्यांसह इतर मूलभूत सुविधा पुरवुन त्यांची प्रसूती अधिक सुखकारक कशी होईल या दृष्टीने टाकळी ढोकेश्वरचे अधीक्षक डॉ प्रकाश लाळगे तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.सुदाम बागल,डॉ.सतीश लोंढे व रुग्णकल्याण समितीचे सदस्य उदय बर्वे,बाळासाहेब खिलारी यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.या बैठकीला डॉ.अभिजित सानप,सरपंच प्रकाश गाजरे,डॉ.अक्षय झिने, डॉ.राहुल सानप,डाॅ.नवनाथ शेलार,डॉ.अतुल बांडे, डॉ.रावसाहेब आंग्रे,डॉ.अमोल झावरे,डॉ.रजनी नवले, डॉ.राखी खर्डे,डॉ.मृदुला शिंदे, डॉ.सरिता पाडळे, ए.आर.चव्हाण, के.बी.सोनवणे, एस.एम.ठोकळ, एस.बी.भालेकर, एम.डी.शेवारे,व्हि.बी.औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वात जास्त गर्भवती महिलांची प्रसूती होत असल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुदाम बागल यांच्या सह वैद्यकीय अधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले.
टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णांलयामध्ये मंगळवार दि. २७ जून रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश लाळगे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ सुदाम बागल टाकळी ढोकेश्वर व परिसरातील विविध गावात काम करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रातील वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर व नर्स व आशा सेविका यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी टाकळी ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जास्तीत जास्त गर्भवती महिलांची प्रसूती संख्याची वाढ होईल त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा द्यावा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तर यावेळी अाशा सेविकांनी स्थानिक पातळीवर येणा-या अडचणी सांगत यापुढील काळात शासकीय रुग्णालयामध्ये गर्भवती महिलांना तयार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव यामुळे अनेक गर्भवती महिला ग्रामीण रुग्णालयाचे प्राथमिक केंद्राकडे पाठ फिरवतात. त्यामुळे ही परिस्थिती संख्या वाढवण्यासाठी व या गर्भवती महिलांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी या आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे तर दुसरीकडे आदिवासी पट्ट्यातील व दुर्गम भागातील अनेक गर्भवती महिलांना जास्तीत सुविधा कशा देता येईल याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
–
टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील उपचारासाठी दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी थेट मध्यरात्री आमदार निलेश लंके यांना फोन करून आपली परिस्थिती सांगितली. त्यानंतर या गर्भवती महिलेला उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार निलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाला दोन वेळा भेट देऊन कर्मचाऱ्यांची कान उघडणी पण केली. त्यामुळे यापुढील काळात पारनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असो वा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी गर्भवती महिलांची प्रसूती संख्या व सोयी सुविधा वाढलीच पाहिजे,त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे यासाठी आमदार निलेश लंके सतर्क दिसून आले आहेत.