इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि .१५/०३/२०२५,

:

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फल्गुन २४ शके १९४६
दिनांक :- १५/०३/२०२५,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३८,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १४:३५,
नक्षत्र :- उत्तरा समाप्ति ०८:५४,
योग :- गंड समाप्ति १४:००,
करण :- तैतिल समाप्ति २७:४५,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – पू. भा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:३८ ते ११:०८ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:०८ ते ०९:३८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०८ ते ०३:३८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
वसंतोत्सवारंभ, अभ्यंगस्नान, आम्रकुसुमप्राशन, इष्टि, मृत्यु ०८:५४ नं., यमघंट ०८:५४ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २३ शके १९४६
दिनांक = १५/०२/२०२५
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
मानसिक चांचल्य जाणवेल. लहानांच्यात लहान होऊन खेळाल. अभ्यासू लोकांच्यात वावराल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

वृषभ
काही क्षणिक गोष्टींचा लाभ घ्याल. स्त्रियांच्या सहवासात राहाल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल. मानाने पैसे कमवाल.

मिथुन
कामात द्विधावस्था जाणवेल. सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. प्रयत्नवादी राहावे लागेल. सामाजिक दर्जा सुधाराल.

कर्क
जोडीदाराचे विचार आग्रही वाटू शकतात. काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य करावे लागतील. वडीलधार्‍या व्यक्तींचे विचार विरोधी भासतील. स्वभावातील मानीपणा वाढेल. आपला मान जपण्यासाठी प्रयत्न कराल.

सिंह
आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार वाढू शकतात. पत्नीच्या सुस्वभावीपणाची चुणूक दिसून येईल. कामातील व्यावहारिक बाजू जाणून घ्यावी. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल.

कन्या
मुलांचे धाडस वाढेल. कामातील चिकाटी वाढवावी लागेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. भागीदाराशी मतभेद संभवतात. आपल्या संपर्काचा वापर करावा.

तूळ
प्रवासात मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. अपयशाला घाबरू नका. घरातील परिस्थिती लक्षात घ्यावी. घरगुती खर्चाचा अंदाज घ्यावा. वाचनाची आवड पूर्ण कराल.

वृश्चिक
कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा विस्तार वाढवावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. जवळच्या मित्रांच्या सहवासात वावराल.

धनू
फार काळजी करत बसू नका. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करता येतील. नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागेल. खर्चाचे गणित सांभाळावे लागेल. जबाबदारीने गोष्टी हाताळाल.

मकर
आत्मविश्वास ढळू देवू नका. काही गोष्टी मनाशी पक्क्या कराव्या लागतील. कामातील उत्साहाला चिकाटीची जोड द्यावी. गोड बोलून कामे करून घ्याल. हातातील अधिकार वापराल.

कुंभ
सगळ्या गोष्टीत तत्परता दाखवाल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत-हसत कामे साध्य करून घ्याल. फार हटवादीपणा करू नका. अति विचार करू नयेत.

मीन
मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. उगाच दिखाऊपणा करायला जाऊ नका. शांतपणे धोरण ठरवावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button