वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकऱ्यांचे कोतुळ येथे आंदोलन!

वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकऱ्यांची
घोषणाबाजी करत निदर्शने
कोतुळ प्रतिनिधी
विज बिल वसुलीसाठी ट्रांसफार्मर बंद करून वीज पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ कोतुळ परिसरातील शेतकऱ्यांनी आज कोतूळ येथील वीज उपकेंद्रावर आंदोलन केले
यावेळी कोतुळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते वीज वितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे या अंतर्गत वीज वितरण चे ट्रांसफार्मर चा वीज पुरवठा बंद करून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी संतप्त झाले त्यांनी आज वीज उपकेंद्रवर आपला मोर्चा ला आणला आणि याचा जाब विचारला कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्याच्या कृतीचा शेतकऱ्यांनी निषेध करत घोषणाबाजी केली वरिष्ठांच्या आदेशानुसार थकबाकी वसुलीसाठी पुरवठा खंडित करण्यात आल्याचे यावेळी सहाय्यक अभियंता श्रीकांत सोनवणे यांनी सांगितले
वीज पुरवठा ताबडतोब सुरळीत करून देण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली
या जुलमी अन्याय न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख यावेळी दिला
याप्रसंगी अकोले बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास भोर धामणगाव चे सरपंच बाळासाहेब भोर माजी सरपंच अशोक शेळके, शिवनाथ जगताप, ज्ञानदेव भोर,, योगेश पोखरकर सोमनाथ गोडसे गोकुळ देशमुख सुरेश देशमुख गौराम चौधरी नवनाथ यादव, सोमदास पवार, बाळासाहेब सोनुले, योगेश पोखरकर आदींसह कोतुळ ,धामणगाव पाट ,मोग्रस, पांगरी ,शेलद पाडाळणे ,लहीत ,नाचणठाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते
——/———-
