प्रति पंढरपूुर पळशी येथे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पांडुरंगाची आरती!

दत्ता ठुबे/ पारनेर:-आज सालाबाद प्रमाणे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर पळशी येथे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते श्री.विठ्ठल राही रुख्मिणी मंदिरामध्ये आरती करण्यात आली. त्यांच्यासमवेत मान्यवर मंडळी उपस्थितीत होते. सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून आजपर्यंत भक्तनिवास, सभामंडप, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, समाजमंदिर तसेच मंदिर परीसर सुशोभिकरण करणेसाठी आजपर्यंत १ कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आज देखील सभामंडप लोकार्पण १५ लाख रुपये तसेच भाविक भक्तांना अन्नदानासाठी स्वयंपाकगृह बांधणे १५ लाख रुपये शुभारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील व गावातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी पांडूरंगाकडे साकडे घातले की, “यावर्षी चांगला पाऊस पडू दे आणि माझ्या बळीराजाला सुख,समृध्दी, भरभराटी लाभो.”


