पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवड ५ जुलै ला , आमदार लंकेना धक्का चेडे ,औटी नी सोडली साथ!

आमदार निलेश लंकेंना धक्का; विजय औटी,अशोक चेडे यांनी सोडली साथ
नितीन अडसुळ,युवराज पठारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ?
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:-
नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या युवराज पठारे यांच्यासोबत आमदार लंके यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष विजय औटी होते. याच वेळी राष्ट्रवादीच्या गटनोंदणीत सहभागी झालेले अशोक चेडे हे देखील पठारे यांचा अर्ज दाखल करते वेळी उपस्थित होते. यामुळे आता पठारे यांच्यासोबत आठ नगरसेवक झाले असून ते सहलीवर रवाना झाले आहेत. राष्ट्रवादीचे आडसूळ यांच्यासोबत सध्या आठ नगरसेवक राहिल्याचे दिसते. दोन्हीकडे समसमान नगरसेवक झाल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीत कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण पारनेरकरांचे लक्ष लागून आहे.
पारनेर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे संख्याबळ ११ तर भाजपा शिवसेना गटाचे संख्याबळ ६ असून या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तरी पण भाजपा व शिवसेनेने युवराज पठारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ५ जुलै रोजी या नगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या नितीन अडसूळ यांना सूचक म्हणून नगरसेवक योगेश मते तर अनुमोदक म्हणून भूषण शेलार आहेत.
राष्ट्रवादीकडून आडसूळ, भाजपा शिवसेनेकडून पठारे
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून नितीन अडसूळ तर भाजपा शिवसेना गटाकडून युवराज पठारे यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांच्या सुचनेनुसार नगराध्यक्ष पदासाठी नितीन अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजप शिवसेना गटाचे उमेदवार युवराज पठारे यांना सूचक म्हणून नगरसेविका नीता देवराम ठुबे तर अनुमोदक म्हणून विद्या अनिल गंधाडे हे आहेत.दुसरीकडे उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा सुरेखा अर्जुन भालेकर यांनी पण नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिला असून तो अद्यापपर्यंत मंजूर झाला नसल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे या नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर लगेच ती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदाची निवडणूक जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेली आहे. या नगराध्यक्षपदाच्या निवडीत भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपले संख्याबळ अाजमावण्यासाठी या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या निवडी मध्ये आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे यांच्या गटा चे शक्ती प्रदर्शन होणार आहे