लिओग्राफीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विक्रमाबद्दल क्रांती नाईक यांचा सन्मान

महेश कांबळे
नगर-लिओग्राफी म्हणजे उलट्या अक्षरात मिरर इमेजमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून नगरमधील क्रांती नित्यानंद नाईक यांनी अनोखा विक्रम केला आहे.त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया’ या बुकमध्ये झाली आहे. होरनाडू कन्नडिंगर संघ अहमदनगरच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये माऊली सभागृह येथे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष के.के. शेट्टी,डॉ.दीपक, विठ्ठल नाईक,नित्यानंद नाईक,के गणेश,के डी राव आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांती नाईक या आर्मी स्कूलमध्ये होम सायन्स या विषयाच्या शिक्षिका होत्या.त्यांना विविध कलांचा छंद आहे त्याचबरोबर लिओग्राफीमध्ये लिहिण्याचाही त्यांना अनोखा छंद आहे.या लिओग्राफीमध्ये काहीतरी अनोखे काम करावे या उद्देशाने त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उलट्या अक्षरात शंभर दिवसात लिहून पूर्ण केला आहे.