आंबित नंतर आता पिंपळगाव खांड ओव्हरफलो मुळा धरणाकडे आवक सुरू

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने मुळा नदीवरील अंबित पाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण भरले आहे

मुळा नदीवरील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण तीन दिवसापूर्वी भरले त्यानंतर आज शनिवारी सायंकाळी 600 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले
या वर्षीच्या पावसाळ्यात अकोल्यातील हे दुसरे धरण भरले आहे पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा आता राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे झेपावला आहे मुळा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर टिकून असल्याने मुळे चा प्रवाह कालपासून वाढला यामुळे पिंपळगाव खांड धरण सायंकाळी 4 वाजता भरले असल्याचे बोरीचे सरपंच संजय साबळे यांनी सांगितले धरणाचे लवकरच जलपूजन करण्यात येईल असे बोरीचे सरपंच संजय साबळे यांनी सांगितले धरणातील जलसाठा आता नागरिकांचे आकर्षण बनले आहे परिसरातील या अथांग जलाशयाचे निसर्ग सौंदर्या कडे लोक आकर्षित होऊ लागले आहे धरणाचे हे रूप पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहे जिल्ह्यातील सर्वात मोठे असणारे 26 टी एम सी साठवण क्षमतेचे राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे आता मुळा नदी पात्रातून आवक सुरू आहे
मुळा कडे आवक सुरू झाल्याने पूरनियंत्रण कक्ष सतर्क केला आहे मुळा धरणात आज सायंकाळी सहा वाजता 8617 दलघफू पाणी साठा शिल्लक आहे मागील वर्षी धरणात या दिवशी 8295 दलघफू पाणी साठा शिल्लक होता मुळा धरणाकडे कोतुळ येथून सायंकाळी सहा वाजता धरणाकडे 338 क्यूसेस चा विसर्ग सुरू होता तर रात्री 9 वाजता हा विसर्ग 1,873 क्यूसेस चा विसर्ग सुरू असल्याची माहिती मुळा पाटबंधारे चे उप अभियंता श्री शरद कांबळे यांनी दिली
