इतर

पारनेर च्या नगराध्यक्ष पदी नितीन अडसूळ यांची बिनविरोध निवड !

नगरसेवक युवराज पठारेची निवडणुकीतुन‌ माघार !

आ. निलेश लंकेनी फडकविला महाविकास आघाडीचा झेंडा

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन अडसूळ यांचा बिनविरोध नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला.५ जुलै रोजी निवड करण्यात येणार होती परंतु युवराज पठारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी नितीन अडसूळ यांची निवड बिनविरोध झाली आहे तर दुसरीकडे ऐन पावसाळ्यात नगरपंचायत राजकीय घडामोडी वातावरण गरमागरम झाले आहे.
पारनेर नगराध्यक्ष निवडणुकीत नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू असून राष्ट्रवादीकडे ९ नगरसेवक असुन त्यात शिवसेनेच्या ३ नगरसेवकांची भर पडली असून राष्ट्रवादीचे संख्याबळ १२ झाल्याचा दावा राष्ट्रवादी समर्थकांनी केला आहे.
त्यामुळे एकीकडे या नगराध्यक्ष निवडणुकीत चुरस निर्माण झाली असताना राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीचे संख्याबळ १२ वर पोहचल्याने विरोधकांना आमदार निलेश लंके यांनी चेकमेट दिला आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतुन माघार घेतली आहे. पारनेर नगरपंचायत १७ नगरसेवक आहेत त्यापैकी १२ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाल्याने त्या नगरसेवकांचे राष्ट्रवादीसोबत छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.ते पाहताच युवराज पठारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग सुखकर केला व नितीन अडसूळ हे बिनविरोध नगराध्यक्षपदावर अारुढ झाले.
पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार निलेश लंके यांच्या सूचनेने नगरसेवक नितीन अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.खासदार विखे यांची समर्थक नगरसेवक युवराज पठारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत या निवडणुकीत रंगत आणली तर दुसरीकडे
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी राजकीय कसब वापरत ९ नगरसेवक असताना शिवसेनेचे तीन नगरसेवक गळाला लावत १२ नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलविले व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी समर्थक तीन नगरसेवक सुरुवातीला राष्ट्रवादीच्या व विखे समर्थकांच्या गटात सहभागी नव्हते मात्र रात्री उशिरा हे तीनही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याची चर्चा आहे.
आमदार निलेश लंके यांच्या गटात असणारे नगरसेवक नितीन अडसूळ,योगेश मते, भूषण शेलार,सुरेखा भालेकर, विद्या कावरे,हिमानी नगरे, प्रियंका औटी,सुप्रिया शिंदे, नीता औटी यासोबत शिवसेनेचे नगरसेवक जायदा शेख,शालुबाई ठाणगे,नवनाथ सोबले,भाजप शिवसेना गटातील नगरसेवक युवराज पठारे सोबत शिवसेनेचे नीता ठुबे,विद्या गंधाडे,राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी,भाजपचे नगरसेवक अशोक चेडे असे पाच नगरसेवक आहेत.

राष्ट्रवादीचे नितीन अडसूळ पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष !..
राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडीचे १२ नगरसेवकांच्या दाव्यानंतर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केलेल्या नितीन अडसूळ यांचा नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला.विखे समर्थक व शिवसेना नगरसेवक युवराज पठारे यांच्याकडे पाच नगरसेवक असून बहुमत होत नसल्याने त्यांना या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतुन माघार घेतली आहे.त्यामुळे एकीकडे नगराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली असताना आमदार निलेश लंके यांच्या राजकीय खेळीने विरोधकांची कोंडी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button