पारनेर महाविद्यालयाची NEET व CET निकालाची उज्वल परंपरा कायम !

शेतकऱ्याचा मुलगा NEET मध्ये 631 गुण
मिळवून तालुक्यात प्रथम !
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
निट परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असुन यामध्ये न्यू आर्टस् ,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर या महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीने उत्तुंग यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
NEET परीक्षेमध्ये बागल श्रेयस बाबासाहेब यांना ९९.३३६(७२० पैकी ६३१) गुण प्राप्त केले श्रेयशचे वडील बाबासाहेब राजाराम बागल हे शेतकरी असुन त्याने हे दैदिप्यमान यश संपादन केले. CET परीक्षेमध्ये शेख राज अनिस याला ९५.१६ , कु.गाजरे जयश्री अशोक हिला ९३ . ४५, ठाणगे सुजल भास्कर ८९.९५ , ठाणगे प्रणाली भागचंद हिला ८४.४४ टक्केवारी प्राप्त केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार सन्मा. नंदकुमारजी झावरे पाटील ,संस्थेचे सचिव आदरणीय जी.डी खानदेशे, पारनेर पंचायत समितीचे मा.सभापती मा.राहुलजी झावरे,विश्वस्त सिताराम खिलारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .रंगनाथ आहेर , उपप्राचार्य डॉ .दिलीप ठुबे ,पर्यवेक्षक प्रा . संजय कोल्हे , कार्यालयीन अधिक्षक श्री सावकार काकडे , कनिष्ठ /वरीष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद , कार्यालयीन सेवक वृंद यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन केले आहे.