नोकरीत पैसा म्हणून नाहीतर सेवा म्हणून कार्य करावे –एस के दरंदले

सोनई –प्रत्येकाने कुठेही नौकरी करत असताना आदरतने, प्रेमाने काम म्हणून केल्यास एक मनाला आनंद व समाधान मिळते, आणि पैसा म्हणून नव्हे तर एक सेवा कार्य कराण्याचा सर्वानी प्रयत्न करावा असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बैंकचे सेवानिवृत शाखाधिकारी एस. के. दरंदले यांनी केले.
शाखाधिकारी दरंदले हे नुकतेच सेवेतुन निवृत झाले, तेव्हा यांना निरोप देण्यात आला तेव्हा ते काही काल भावनिक झाले होते.
घोडेगाव येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे शाखा अधिकारी संजय काकासाहेब दरंदले( एस. के. साहेब) हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा घोडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी,शिंगवे तुकाई सेवा सोसायटी, मांडे मोरगव्हाण सेवा सोसायटी, राजेगाव सेवा सोसायटी, झापवाडी सेवा सोसायटी, यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरंदले यांनी शेतकरी सभासदांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत केली. बँक खातेदारांना तत्पर व योग्य सेवा दिली सेवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.समस्त गावकरी व सोसायटीच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी घोडेगाव सोसायटीचे चेअरमन बालू पाटील सोनवणे, व्हाईस चेअरमन कोरडे पाटील, दिलीपराव लोखंडे, राजेश पाटील रेपाळे, संदीप सोनवणे, भास्कर पाटील सोनवणे, अन्सार भाई शेख, अशोक नाना येळवंडे शरद पाटील सोनवणे,डॉक्टर चौधरी जनार्दन पाटील सोनवणे,ज्ञानेश्वर पाटील सोनवणे, रामदास सोनवणे, शिवाजी सोनवणे, राजू पाटील होंडे, उद्धवराव सोनवणे सर, बाबासाहेब सोनवणे, बबनराव बाराहाते, शेषराव शिंदे साहेब, श्रीराम काळे,गणपत पालवे, मल्हारी शिंदे, पांडुरंग होंडे, संजय सुरुसे,सचिव श्री दिघे भाऊसाहेब, श्री लोंढे भाऊसाहेब, नितीन सोनवणे, रावसाहेब शिरसाट,वाकचौरे भाऊसाहेब, पासलकर भाऊसाहेब,नजन भाऊसाहेब,बाळू शिरसाठ,सीताराम चेमटे, जालिंदर चेमटे,व तालुका बैंक कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.