
सोनई–प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील बहिरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी डॉ. संतोष कृष्णा शेळके तर व्हा.चेअरमन पदी सौ. भारती किशोर पटारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकतीच नवनिर्वाचित संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात निवडणूक निर्णय अधिकारी आर.एन.जहागीरदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ए. व्ही.पुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडप्रक्रिया पार पडली.
या प्रसंगी संचालक अशोक नागरे,रवींद्र काळे, संजय हेलवंडे,कडूबाळ टेकाळे, अर्जुन भोंगळ, अशोक चव्हाण,नारायण कडू,भीमराज दाणे, शकुंतला चापे, कमल चापे, विद्यमान चेअरमन परसनाथ नळघे, राजेंद्र पटारे,संजय पवार,अनिल कोरेकर, शिवनाथ कुताळ, योगेश काळे, सुनील नागरे,सोमनाथ वाखुरे, चंद्रकांत वाखुरे,नंदू कनगरे,यांच्यासह सभासद उपस्थित होते.
या निवडी चे मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे