कोतुळ येथील निखील गिते याची भारतीय सैन्य दलात निवड!

कोतुळ प्रतिनिधी
भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने येथील निखील लक्षण गीते याचा येथील ग्रामस्थांनी सत्कार करत त्याला शुभेच्छा दिल्या
माळी समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण काशिनाथ गिते व सौ अनिता लक्ष्मण गिते यांचे सुपुत्र निखिल याने अतिशय खडतर परिस्थितीतुन शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्याची भारतीय सैन्य दलात निवड झाली

निवडी बद्दल त्याचा येथे सत्कार आयोजित करण्यात आला यावेळी पुणे बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी जे देशमुख, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख, राजू पाटील देशमुख ,सयाजीराव देशमुख, सचिन गिते ,अनिकेत गिते ,सुनील गिते, ग्रा.प. माजी सदस्या मीरा गिते, नरेश साळवे ,अमोल कोते, सोसायटीचे संचालक बाळासाहेब बेळे, सतीश गिते ,लक्षण गिते ,चंदू गीते, विजय खरात , भारत गिते ,अनिता गिते, शोभा गिते, जयश्री गिते, संजीवनी गिते ,छाया गिते ,संगीता गायकवाड , दीपाली गिते ,शीतल गिते, शीला गिते ,मीना गिते, रेश्मा गिते , इंदू गिते, कौंशल्या गिते, शकुंतला बेळे, मनीषा बेळे,अस्मिता कोते ,मालती बेळे, आदी मान्यवर उपस्थित होते निखिल गिते याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
