इतर
पतंजली परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी

नगर- अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने नक्षत्र लॉन या ठिकाणी सर्व साधकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ६ ते ७ या वेळेत प्राणायाम व योग घेण्यात आले नंतर प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे जिल्हा प्रभारी प्रा बाळासाहेब निमसे ,अविनाश ठोकळ, मधुकर निकम, भगवान फुलसौंदर,महिला समिती प्रभारी मनीषा लोखंडे ,दिलीप मते,अरुण खामकर रत्नाकर जोशी,साहेबराव बोरुडे,रघुनाथ केदार,श्री साळवे यांचे मार्गदर्शन झाले नंतर स्वामी रामदेवजी महाराज यांच्या आयुष्यासाठी तसेच संपूर्ण जगात सुख समाधान व शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर पर्जन्य व्हावे यासाठी ही प्रार्थना करण्यात आली.
गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ योगशिक्षक रत्नाकर जोशी तसेच ग्रुपमधील अमृता कांबळे, स्नेहल तांदळे यांचाही सन्मान करण्यात आला नक्षत्र योगाचे प्रमुख अविनाश व कल्पनाताई ठोकळ तसेच गेली अनेक वर्ष सहकार्य करणारे माजी महापौर भगवान फुलसौंदर व सुनिता फुलसौंदर यांचाही शाल बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नक्षत्र प्राणायाम ग्रुप यांनी प्रयत्न केले तर संपूर्ण जिल्हा समितीने परिश्रम घेतले.
