
श्री साई मुर्ती प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण,साईधाम पदयात्री निवास लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
संजय साबळे
संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीच्या नगरी मध्ये दिडशे वर्षांपूर्वी साई बाबा काही दिवस वास्तव्यास होते अशी माहिती जुने जानकर लोक सांगतात. त्यानुसार लोकसहभागातून येथे भव्य- दिव्य असे 1 कोटी 10 लाख रूपये खर्च करून साई मंदिर उभारण्यात आले आहे. शुक्रवार दि. 19 ते गुरुवार ता. २५ मे रोजी श्री साई मुर्ती प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण,साईधाम पदयात्री निवास लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला चंदनापुरी हे गाव वसलेले आहे.दिडशे वर्षांपूर्वी साईबाबा या गावात काही दिवस वास्तव्यास होते असे गावातील जुने जानकर लोक सांगत आहे.त्यामुळे गावामध्ये साई बाबांचे मंदिर व्हावे अशी मागणी नागरिकांची होती त्यानुसार ग्रामस्थांनी २०१७ मध्ये लोकसहभागातून साई मंदिर बांधण्यास सुरूवात केली आणि २०२३ मध्ये आज भव्य दिव्य असे साई मंदिर साकारले आहे. यामध्ये सर्व दिंड्या व पायी पदयात्री ,स्वच्छतागृह,स्वयंपाक गृह सह निवासाची सह सुविधा करण्यात आल्या आहेत.त्यासाठी एक कोटी दहा लाख रूपयांच्या आसपास खर्च आला आहे.हे साई मंदिर बांधण्यासाठी कौसल्याबाई व अनुसयाबाई शिवाजी राहाणे या दोघींनी पाच गुंठे जागा मोफत दिली आहे.हे मंदिर आज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सात वर्षांनंतर या साई मंदिराचे काम झाले आहे.त्यामुळे शुक्रवार ता. १९ ते गुरुवार २५ मे या सात दिवसांत ग्रंथपुजन व पारायण सोहळा,श्री साई चरित्र वाचन, श्री मूर्तीची भव्य शोभ यात्रा,दररोज संध्याकाळी सात ते नऊ किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी श्री साई मुर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण,साईधाम पदयात्री निवास लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.याच बरोबर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्या- येणाऱ्या सर्व दिंड्यांना याठिकाणी हमखासपने थांबता येणार आहे.तरी कार्यक्रमासाठी तालुक्यातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंदनापुरी ग्रामस्थांनी केले आहे.