महाराष्ट्रराजकारण

….”तर जयंत पाटलांसह मी पक्ष सोडेन”, जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान!

मुंबई-अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांमुळे ठाण्यात पक्ष संपल्याचा गंभीर आरोप केला. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवारांसह त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली. तसेच शरद पवार आमचे विठ्ठल असून त्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला. अजित पवारांनी तर आव्हाडांमुळे ठाण्यात पक्ष संपल्याचा गंभीर आरोप केला. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते शनिवारी (८ जुलै) ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “लोकांना या प्रकाराची किळस येते. बापाला बाप म्हणायचं नाही आणि शेजारच्याला बाप म्हणायला सुरुवात करायची हे लोकांना आवडत नाही. मी आज जाहीर करतो की, आमच्यासारख्यांनी शरद पवारांना घेरल्यामुळे हे झालं असेल, तर मी येवल्यात जाऊन शपथ घेणार आहे. त्यांनी परत यावं मी आयुष्यात परत कधी त्रास देणार नाही. मी दूर कुठेतरी निघून जाईन.”

“…तर मी शपथ घेतो की, मी जयंत पाटलांसह पक्ष सोडेन”

मला सत्तेचं राजकारण करायचं नाही. पैशाचं, साखरेचं, बँकेचं असं कुठलंच राजकारण करायचं नाही. महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे आणि शरद पवारांची ताकद वाढली पाहिजे या भावनेचा मी आहे. त्यांना वाटत असेल की, माझ्यासारख्या माणसाला पक्षातून बाहेर काढल्यावर पक्ष खूप वाढणार आहे किंवा या दोन चार लोकांमुळे ते बाहेर पडले असा त्यांचा दावा असेल, तर मी शपथ घेतो की, मी तर सोडाच, मी जयंत पाटलांनाही घेऊन जाईन,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

या बडव्यांना पक्षात नाही राहायचं”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “ते जयंत पाटील आणि माझ्यावर टीका करत आहेत की, या बडव्यांनी शरद पवारांना घेरलं आहे. या बडव्यांना पक्षात नाही राहायचं. आम्हाला काहीच नको आहे. आम्ही सोडून जातो. त्यांनी परत यावं आणि शरद पवारांना त्रास देऊ नये. शरद पवारांना मी जे पाहतोय ते बरोबर नाही.”

आम्ही खराब केलं, तर आम्ही जातो ना, त्यांनी यावं”

त्यांची भावना आहे की, आम्ही खराब केलं, तर आम्ही जातो ना, त्यांनी यावं. आम्हाला पद नको आहे. आम्हाला प्रतिष्ठा मिळाली. आमचं महाराष्ट्राच्या इतिहासात नाव लिहिलं जाईल. इतकं बास झालं, आणखी काय पाहिजे. माणसाला अजून काय हवं असतं. यापेक्षा काहीच मोठं नाही. शरद पवारांसाठी आम्ही हा त्यागही करायला तयार आहोत,” असंही जितेंद्र आव्हाडांनी नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button