कृषी

हायकोर्टाच्या आदेशाने राळेगणसिद्धी ते नारायणगव्हाण शिवरस्त्याची रोव्हरद्वारे मोजणी सुरू

दत्ता ठुबे

पारनेर :-अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ते नारायणगव्हाण शिवरस्त्यापासुन सुरू झालेला महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचा लढा प्रशासकीय संघर्षातुन न्याय न मिळाल्याने ॲड.प्रतिक्षा काळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली. ॲड. प्रतिक्षा काळे यांनी शेतकऱ्यांची प्रभावीपणे बाजू मांडत याठिकाणी शेतकऱ्यांना मोठे यश प्राप्त झाले

राळेगणसिद्धी नारायणगव्हाण शिवरस्त्यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. सदर शिवरस्त्याची मोजणी सुरू केली असुन लवकरच हद्द निश्चिती करून शिवरस्ता खुला करण्याचे आश्वासन तालुका प्रशासनाने दिले आहे.

पारनेर भुमिअभिलेखचे उपधीक्षक माधवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका भुमिअभिलेखचे अविनाश ठोकळ ,किरण हराळ,संदिप भोसले यांनी मोजणी सुरू केली.यावेळी तलाठी भाऊसाहेब बढे, अमोल सरकाळे, महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, शिरूर कृती समितीचे शांताराम पानमंद,दत्तात्रय बांगर,भाऊसाहेब गाजरे,कांतीलाल औटी,रुपेश फटांगडे,सोमनाथ फटांगडे,गोपीनाथ औटी,रामदास फटांगडे,रोहित फटांगडे,मच्छिंद्र औटी,निलेश औटी,सिताराम गाजरे,विलास औटी,शिवाजी मापारी,बजरंग औटी,बाबुराव कळमकर,नितीनभैय्या शेळके,अनिल उगले,संपत उगले, हौशिराम कुदळे दसरे सर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– अहिल्यानगर पारनेर येथिल यचिकेच्या धर्तीवर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मागेल त्याला ६० दिवसांच्या आत सरकारने शेतरस्ता द्यावा अशी मागणीही राज्य सरकारकडे करण्यात आली असुन चळवळीच्या माध्यमातून श्रीगोंदा तहसिल कार्यालयाने विशेष परिपत्रक काढत चांगले काम याठिकाणी केल्यामुळे श्रीगोंदा मॉडेल तयार करून राज्याला दिशादर्शक तालुके निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने चळवळीच्या २१ मागण्या मान्य कराव्यात व समृद्ध शेतकऱ्यांच ,समृद्ध महाराष्ट्राच स्वप्न पूर्ण करावे-

शरद पवळे

महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते

दादासाहेब जंगले पाटील

राज्य समन्वयक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button