लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुपचा दाते कुटुंबीयांना मदतीचा हात

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
म्हसोबा झाप ग्रामपंचायत मधील कन्हेर येथील दाते कुटुंबातील नवनाथ दाते हा युवक गेली पाच महिन्यांपासून आजाराचा सामना करत आहे. दाते कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंब आहे घरातील कर्ता पुरुषच अंथरुणाला खिळून बसल्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. गावचे प्रथम आदर्श सरपंच प्रकाश गाजरे यांनी दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांची भेट घेतली. नातेवाईक व डॉक्टरांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या युवक मित्राच्या उपचारासाठी दोन लक्ष रुपयांची तातडीची आवश्यकता आहे. सामाजिक बांधिलकी जपत युवक मित्राच्या उपचारासाठी निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप मधील मित्र परिवाराला आवाहन करण्यात आले. निलेश लंके प्रतिष्ठानचे व संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष व सरपंच प्रकाश गाजरे यांच्या आव्हानाला गावातील युवक लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुपच्या मित्र परिवाराने सकारात्मक प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. यामध्ये सरपंच प्रकाश गाजरे, पांडुरंग आहेर, किसन गाढवे, संदीप निमसे, गणेश वाळुंज, स्वप्नील वाळुंज, राहुल रोहकले, संदीप रोहकले, अरुण बेलकर, बारकु रोहकले, गणेश आगळे, अनिकेत आरोटे, बन्सी वाळुंज, दत्तात्रय हांडे, संतोष हांडे, राजेंद्र दरेकर, बाबाजी आरोटे, सुभाष दरेकर, माधव आहेर, तुषार रोहकले, शिवाजी वाकळे, प्रवीण शिंदे, कृष्णराव आहेर, संतोष आग्रे,
बाळकृष्ण गाजरे, अप्पा शिंदे,
संदीप आहेर, बबन पानमंद, उत्तम दाते, एकनाथ आहेर, नवनाथ आग्रे,
अशोक आहेर, प्रदीप रोहकले, बाळू आहेर,
संतोष चिकने, विठ्ठल आहेर, अविनाश आहेर, केतन शिंदे, संदीप गुंजाळ, अण्णासाहेब टेकुडे, निलेश शिंदे (टाकळी ढोकेश्वर), अक्षय दरेकर, बाळासाहेब वाळुंज, बन्सी केदार,सोपान खोडदे, हरिभाऊ पानमंद, गणेश वाकळे, राजेंद्र आरोटे, संदीप गाढवे, स्वप्नील बेलकर, विनायक निमसे, अनिल गंधाक्ते मित्र परिवार आणि निलेश लंके प्रतिष्ठाण वडझिरे, संदीप आहेर, गोरख आहेर, रवींद्र जाधव (बोरी, जाधववाडी), विठ्ठल शिंदे, राहुल चिकने, सागर दरेकर, पद्मावती बबन आहेर, संतोष शिंदे, सागर आहेर, संतोष धों. आहेर, राजेंद्र वाळुंज, हरिदास आहेर, नामदेव आग्रे, अंकुश पायमोडे (टाकळी ढोकेश्वर), बाबासाहेब निमसे , रोहिदास आहेर, स्वप्निल दरेकर आदी. तरुणांनी एकत्र येत आवाहनाला प्रतिसाद देत ८० हजार रुपयाची तातडीची मदत अवघ्या काही तासात उपलब्ध करून दिली. सरपंच गाजरे व नवनाथ दाते यांच्या कुटुंबीयांकडून मित्रमंडळींचे ॠण व्यक्त करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लंके प्रतिष्ठानचे व संघर्ष ग्रुप मित्र मंडळाचे समाजात कौतुक होत आहे.