
अकोले/प्रतिनिधी –
जिव्हाळा आयुष्यभर आपुलकीचा ओलावा टिकून ठेवतो.जरा कोणी काही वाईट दिले की,माणूस दु:खी होतो.म्हणूनच देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.या उक्तीप्रमाणे संस्कृती प्रतिष्ठानचा शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम विदयार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथे संस्कृती प्रतिष्ठान ट्रस्ट कांजुरमार्ग मुंबई यांचेकडून इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतच्या सर्व विदयार्थ्याना शैक्षणिक तसेच क्रिडा साहीत्य वाटप करण्यात आले.
यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे प्रमुख अतिथी म्हणून विचारमंचावरून बोलत होत्या.
याप्रसंगि कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तृप्तेश शिरोडकर हे होते.यावेळी मार्गदर्शक संतोष पासलकर,विश्वस्त शैलेश तारकर,सचिव जयेश मगर,सहसचिव महेश सावंत,कार्याध्यक्ष योगेश पेडणेकर,महिला अध्यक्षा उमा सडविलकर,रोहिणी शेटे, इतर सभासद,प्राचार्य मधुकर मोखरे,माजी प्राचार्य लहानु पर्बत,लिपिक भास्कर सदगिर यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी उपस्थित होते.
बिजमाता राहिबाई पोपेरे यांनी पुढे बोलताना आपल्या मायभूमिला विसरू नका,आईवडीलांचे नाव मोठे करा.मि शाळा शिकले नाही पण निसर्गाच्या शाळेने मला मोठे केले.त्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत करा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तृप्तेश शिरोडकर यांनी आपल्याला मोठे व्हायचे असेल तर मोठया लोकांची नाही तर चांगल्या लोकांची संगत महत्वाची आहे.आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही तर माणसाचा आधारही खुप महत्वाचा असतो.असा अशावाद व्यक्त केला.
ट्रस्टचे मार्गदर्शक संतोष पासलकर यांनी मोठेपणा हा पैशावर किंवा वयावर अवलंबून नसतो,तर तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. पैसा हा जरी जीवनाचा महत्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे.जो व्यक्ती आयुष्यात माणुसकी जपतो तो नक्कीच विचारांनी सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरत असतो. असे विचार व्यक्त केले.
सचिव जयेश मगर, कार्याध्यक्ष योगेश पेडनेकर, माजी प्राचार्य लहानू पर्बत आदींनी बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत प्राचार्य मधुकर मोखरे यांनी केले.
सुत्रसंचालन प्रा.सचिन लगड यांनी केले तर लिपिक भास्कर सदगिर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
