इतर

डाॕ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात मानसशास्त्राची ‘राष्ट्रीय परिषद संपन्न.


आकुर्डी ः डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी मानशास्त्र विभागाच्यावतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

‘सायकोलाॕजी आणि मेंटल हेल्थ डिसआॕर्डर’ हा या परिषदेचा विषय होता. या परिषदेमध्ये वेग-वेगळ्या राज्यातून विविध तज्ज्ञ मार्गदर्शक, प्राध्यापकासह 74 संशोधक विद्यार्थी सहभागी झाले.
या परिषदेच्या उदघाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख प्रा. डाॕ. बी.आर.शेजवळ व राज्यस्थान येथील प्रा. डाॕ. चंद्राणी सेन, प्राचार्य. डाॕ. रणजीत पाटील हे होते. चंद्राणी सेन यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की शारिरीक स्वास्थ्या प्रमाणे मानसिक स्वास्थ्यही फार महत्वाचे आहे. म्हणूनच या कार्यशाळेच्या विषयाला फार महत्त्व आहे असे मत व्यक्त केले. डाॕ. शेजवळ यांनी सांगितले की शारिरीक आणि मानसिक आरोग्यात आपण फरक करू शकत नाही. त्यामुळे हा विषय एवढा सरळ साधा नाही असे मत मांडले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी आपल्या प्रास्ताविकात ही परिषद घेण्यामागील हेतू व उद्देश सांगितला. प्राचार्य डाॕ. रणजित पाटील यांनी परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या. मानसशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख सोमा नाईक यांनी उपस्थिताचे स्वागतकरतानाच परिषदेचा लेखाजोगा मांडला. प्रा. चेतन सरवदे सूत्रसंचालन केले तर या परिषदेचे समन्वयक प्रा. डाॕ. मुकेश तिवारी यांनी आभार मानले.
या परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रो. डाॕ. बी. आर. शेजवळ, प्रा. डाॕ. चंद्राणी सेन, एम. आय. टी. महाविद्यालयाच्या प्रा. डाॕ. मिनाक्षी भानुशाली, कर्नाटक येथील डाॕ. व्ही. सुधाकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मानशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डाॕ. राजेंद्र म्हस्के यांनी आपले वेगवेगळ्या विषयावर पेपर सादर करून सर्व उपस्थित संशोधकांना मार्गदर्शन केले. तसेच वीस संशोधकांनीही या परिषदेमध्ये आपले पेपर सादर केले.
या दोन दिवशीय परिषदेच्या समारोप सामारंभासाठी प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागाचे विभागप्रमुख डाॕ. दीपक माने हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात खेळातही मानसशास्त्र कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले.
या परिषदेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.पी. डी. पाटील , उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मानशास्त्र विभागाच्या प्रा. भार्गवी कुलकर्णी, प्रा. उज्ज्वला कवडे, प्रा. राधाकृष्ण ठाणगे, डाॕ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button