मिशन आपुलकी अंतर्गत विठे केंद्रातील शाळांना संगणक वाटप

राजूर प्रतिनिधी:-
शनिवार दिनांक 08/07/2023 रोजी विठे केंद्रातील सर्व आठ शाळांना मिशन आपुलकी अंतर्गत संगणक वाटप करण्यात आले.
बोरिवली मुंबई येथिल दांपत्य सौ. सुविधा संदेश शिंदे व श्री. संदेश गिरीश शिंदे यांच्या दातृत्वाने विठे केंद्रातील आठ शाळांना संगणक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी विठे येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी राजूर बीट च्या विस्ताराधिकारी श्रीम.सविता कचरे मॅडम, केंद्राच्या केंद्रप्रमुख स्वाती अडाणे मॅडम, सर्व शाळांचे मुख्यध्यापक हजर होते.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीम.स्वाती अडाणे मॅडम यांनी करून दिला. केंद्रप्रमुख मॅडम यांच्या प्रयत्नाने च केंद्रातील सर्व शाळांना संगणक मिळाले.
सौ. सुविधा शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की आजचे शिक्षणाला संगणकाची जोड पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात संगणका शिवाय पर्याय नाही. म्हणून सर्व मुलांनी संगणकाचा वापर आपल्या अध्ययन अध्यापनात रोज करावा.
श्री. संदेश शिंदे यांनी बोलतांना सांगितले की आई वडिलांचे व गुरुचे आज्ञापालन करावे. जीवनात मोठे व्हायचे असेल शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मी सुद्धा सर्वसामान्य कुटूंबातूनच शिक्षण घेऊन मोठा झालो. जीवनात एक ध्येय ठेवून जीवन जगले पाहिजे . त्या जाणिवेतून च आज मी तुम्हा सर्वांना संगणक देत आहे.
राजूर बीट च्या विस्ताराधिकारी श्रीमती.सविता कचरे यांनी बोलतांना सांगितले की माहिती व तंत्रज्ञानाचा वापर योग्य पध्दतीने झाला तर ते जीवनाला मार्गदर्शनच ठरेल.वाडी वस्तीतील मुलांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने शिक्षण घेणे सोईचे होईल.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सुधीर बोऱ्हाडे व त्यांच्या सर्व शिक्षकांनी केले. सूत्रसंचालन शाळेच्या तंत्र स्नेही शिक्षिका स्मिता धनवटे यांनी केले.
आभार कार्यक्रम भोजदरी शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुटे यांनी केले.
या उपक्रमाचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ व सर्व विस्ताराधिकारी या सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक व स्वागत केले.
कार्यक्रम प्रसंगी शिक्षक दुणदा ढगे सर,अशोक देशमुख , बाळासाहेब भांगरे , नामदेव बांडेसर, नंदू नाडेकर ,दीपक बोऱ्हाडे , राजेश पवार ,विठ्ठल चव्हाण , बाळू चौधरी उपस्थित होते.