इतर

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन बढे

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठा महासंघाची शिरूर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असून प्रसिद्धी प्रमुख पदी राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन बढे यांची निवड करण्यात आली आहे
अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पांचगे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा दुर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुका अध्यक्ष श्यामकांत वर्पे यांनी अर्जुन बढे यांना निवडीचे पत्र दिले मराठा संघाने सोपवलेली जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन अर्जुन बढे यांनी यावेळी दिले
अर्जुन बढे गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून पाच वर्षे पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शिंदे तालुका युवक अध्यक्ष गणेश सरोदे माजी तालुका अध्यक्ष सुदाम कोलते महिला तालुका अध्यक्षा उर्मिला फलके शिक्षक संघटनेच्या ज्योती वाळके शिरूर शहराध्यक्षा साधना शितोळे तालुका उपाध्यक्ष सुधीर तांबे सरचिटणीस संतोष झंजाड स्नेहा लंघे गंगाधर शिंदे जयश्री थेऊरकर भारती बारवकर रुपाली चौधरी यांच्यासह मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांनी नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button