नाशिक मध्ये रोटरी च्या “शेतकरी बाजाराचे” उद्घाटन
नाशिक दि11
“रोटरी च्या शेतकरी बाजाराचे” उद्घाटन “म वि प्र” चे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले
नाशिककरांसाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या ५-६ वर्षांपासून सर्व नागरिकांना चांगल्या प्रतीच्या, संपूर्णपणे ऑरगॅनिक पद्धतीने तयार केलेल्या भाज्या मिळाव्यात व त्याचबरोबर जो शेतकरी ह्या भाज्या आपल्या शेतात लावतो त्यालाही याथोचीत मोबदला मिळावा ही प्रेरणा घेऊन रोटरी क्लब ने ह्या उपक्रमाची सुरुवात केली होती.
दर रविवारी शेतकरी आपला भाजीपाला घेऊन येतात व नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी दराने देण्याचा प्रयत्न करतात. जेंव्हा काही भाज्यांचे भाव आकाशाला टेकलेले असतात तेंव्हा देखील या रोटरी शेतकरी बाजारात रास्त दरानेच भाज्या दिल्या जातात. जसे सध्या टोमॅटो चे भाव बाजारात जरी ₹१५०.०० प्रती किलो असले तरी या आमच्या बाजारात टोमॅटो फक्त ₹३०.०० प्रती किलो ग्राहकांना दिले जातात.
हा बाजार दर रविवारी सकाळी ८.३० ला सुरू होऊन साधारणपने १० वाजेपर्यंत भरत असतो.
या १ जुलै पासून “उदोजी शैक्षणिक संग्रहालय” या ठिकाणी भरणार आहे. या जागेत नवीन उत्साहात नवीन वर्षात जोमदार सुरुवात झाली. याचे उद्घाटन एम व्ही पी चे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे यांनी केले. या वेळी, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, कम्युनिटी सर्विस डायरेक्टर, पास्ट प्रेसिडेंट,बोर्ड डायरेक्टर्स, मंथ लीडर्स व संपूर्ण कम्युनिटी सर्व्हिस नोन मेडिकल व रोटरी बाजाराच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.
जवळपास १०० रोटरी सदस्य व ग्राहक याचा फायदा दर रविवारी घेत आहेत. नाशिकच्या नागरिकांनी याचा जास्ती जास्त लाभ घ्यावा असे असे आवाहन कटण्यात आले आहे.