जुन्या पेन्शन संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी प्रविण झावरे पाटील यांची निवड

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
गुरुवार, दि. १० एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा अहिल्यानगरच्या जिल्हा कार्यकारणीच्या निवडीसाठी शेतकरी भवन, मार्केट यार्ड येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेचे नेतृत्व आणि अध्यक्षता राज्य सहकार्य अध्यक्ष राजेंद्र ठोकळ यांनी केली, तर राज्य निरीक्षक रामदास वाघ (विश्वस्त) आणि सुमित बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती. खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण जिल्हा कार्यकारणी, उच्चअधिकार समिती आणि सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या.नूतन जिल्हा कार्यकारणीमध्ये प्रविणकुमार झावरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. मनीषा वाकचौरे यांना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, निलेश राजवळ यांना जिल्हा सल्लागार, राज कदम यांना जिल्हा कार्याध्यक्ष, शिवनाथ भुजबळ यांना जिल्हा सरचिटणीस, अरविंद थोरात यांना जिल्हा कोषाध्यक्ष, मच्छिंद्र कदम यांना दक्षिण जिल्हाप्रमुख, सय्यद तोसीफ यांना उत्तर जिल्हाप्रमुख, रामदास चौरे, अशोक ढोले आणि सोन्याबापू भांड यांना जिल्हा उपाध्यक्ष, संतोष जाधव यांना सहकार्याध्यक्ष, संदीप कवडे यांना सहसरचिटणीस, नितीन दळवी यांना कार्यालयीन चिटणीस, शैलेश खणकर यांना जिल्हा प्रवक्ते, संदीप भालेराव यांना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, रमेश थोरात यांना जिल्हा संपर्कप्रमुख, नितीन भोईटे आणि आशिष पठारे यांना जिल्हा संघटक, तर संदीप पागिरे यांना सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवडण्यात आले.
जिल्हा उच्चअधिकार समितीमध्ये केशवराज कोल्हे यांची जिल्हाध्यक्ष, देवेंद्र आंबेटकर यांची सरचिटणीस, भाऊसाहेब गिरमकर यांची कार्याध्यक्ष, प्रतीक नेटके यांची कोषाध्यक्ष, भाऊसाहेब पाचरणे आणि सतीश चव्हाण यांची उपाध्यक्ष, तर प्रशांत गवारी यांची सल्लागार म्हणून निवड झाली.सल्लागार समितीमध्ये ज्ञानेश्वर सोनवणे, शरद कोतकर, शिवाजी आव्हाड, सतीश पठारे, अशोक जाधव, अरुण पठाडे, संदीप खाडे, संतोष हजारे, राम हरी बांगर, बाबासाहेब म्हस्के आणि राजेश्वर पवार यांचा समावेश आहे.सभेच्या यशस्वीतेसाठी माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब गाढवे, शरद कोतकर, सचिन नाबगे, एकनाथ रहाटे, अमोल साळवे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष आणि तालुका कार्यकारणी यांनी परिश्रम घेतले. जिल्हाभरातून सतीश पटारे, प्रशांत गवारी, शिवाजी आव्हाड, नितीन भोईटे, अरुण पटाडे, संदीप कवडे, विनोद देशमुख, नितीन दळवी, संतोष ढोले, राहुल लोखंडे, मनोहर आढळ, सतीश कासार, राजू खरमाळे, मच्छिंद्र कदम, राहुल ढाकणे, अविनाश नवसरे, सोमनाथ शेंडे, कानिफनाथ बोराडे, अशोक जाधव, चंद्रकांत गट, युवराज हिलाळ, संदीप गायकवाड, सोमनाथ अनारसे, जयवंत ठाणगे, संतोष नाबगे, संग्राम झावरे, संजय झावरे, विशाल बर्वे, अजय ठुबे, गोरक्ष रोकडे, विशाल कुलट, अक्षय पवार, ज्ञानोबा राठोड, राजेश्वर पवार, रवींद्र सुपारे, शंकर पवार, बी.के. हिंगे, संजय घायवट, विजय दावभट, ज्ञानेश्वर जाधव, बापूसाहेब चेमटे, वैभव ठाणगे, रामदास चौरे, कानिफनाथ साठे, लक्ष्मण गवळी, स्वप्नील गाडेकर, तुषार केदार, आशिष पठारे, संदीप बोरुडे, अतुल मोरे, रामहरी बांगर, प्रवीण शिंदे, रवींद्र इंगोले, संतोष ससाने, प्रशांत लाटे, संतोष पवार, दत्तात्रय सिनारे, विलास घावटे, विशाल पाचरणे, रवींद्र फुंदे, प्रसाद भिसे, असलम शेख, गणेश बांडे, संतोष नरसाळे, भाऊसाहेब केदार, नितीन गारूडकर, अशोक घालमे, ज्ञानेश्वर गायकवाड, सुभाष लवांडे, राजेंद्र जरे, योगेश खेडकर, किशोर भालेकर, रमेश थोरात, गणेश जाधव, संतोष दरेकर, राजू चव्हाण, प्रवीण खाडे, किशोर जगताप, आशिष निमसे, पंचशील साळवी, अमोल दळवी, संतोष ठाणगे, शौकत शेख, सतीश चव्हाण, अल्ताफ बागवान, विजय कोंडार, दत्ता धिंदळे, संगिता शिरसाठ, ठाणगे, गव्हाणे, वैशाली गायके, रोहिणी पठारे, संध्या घोलप, सोनल रोहकले, मनीषा गाडीलकर, निर्मला साळुंखे, प्रितम बर्वे, सुचेता खिलारी, चित्रा तांबे आदींसह बहुसंख्य पेन्शन शिलेदार उपस्थित होते
.या विचार सभेत जुन्या पेन्शन योजनेच्या प्रश्नावर पुन्हा राज्यभरात तीव्र लढा उभारण्याचा संकल्प घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब गाढवे यांनी केले, सूत्रसंचालन केशव कोल्हे यांनी, तर आभार प्रदर्शन सचिन नाबगे यांनी केले. सर्वांच्या एकजुटीने सभा यशस्वी झाली आणि संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.