इतर

नागरदेवळे येथे संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त सप्ताहास प्रारंभ

          नगर-येथील नागरदेवळे येथे संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त दि.१० ते  १७ जुलै पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे.
      सप्ताह मधील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ ते ६.३०काकडा भजन,स.९ ते १२.३०ज्ञानेश्वरी पारायण,दु.३ते ५ संत सावता माळी ग्रंथ वाचन,सायं.५ते ६ हरिपाठ,रात्री ७ ते ९ हरिकिर्तन होणार आहे. यामध्ये कन्हेरकर महाराज,चंद्रकांत महाराज खळेकर,अँड.सुनिल महाराज  तोडकर,सागर महाराज बेलापूकर,बबन महाराज बहिरवाल,केशवमहाराज उखळीकर(भागवताचार्य),श्रीनिवास महाराज घुगे(रामायणाचार्य),गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार आहेत.
          सप्ताहमध्ये दुपारी व रात्री सर्वासाठी महाप्रसाद,पंगत ठेवण्यात आली आहे त्यामध्ये कै.मच्छिंद्र सहादू घाडगे स्मरणार्थ दिपक मच्छिद्र घाडगे कडून,,सिध्देश्वर मित्र मंडळ, घाडगेमळा, मल्हारी भागुजी पानमळकर,संतोष रामभाऊ शेलार,राकेश राधाकिसन ताठे,अभिजीत अनिलराव झोडगे,नागुजी मामा राऊत पुण्यतिथी,राहुलजी पानसरे(पं.स.सदस्य),ठकन राव सत्रे यांच्या स्मरणार्थ विलास ठकन सत्रे,गोपाळराव झोडगे यांच्या स्मरणार्थ संदेश गोपाळराव झोडगे यांच्याकडून,सतिष रामचंद्र शिंदे,भुषण भुजबळ,गणेश घाडगे,गणेश वराडे,राजु(पोपट) धाडगे. सावता मंडप डेकोरेटर्स,गणेश पानमळकर,दत्ता काटकर,राजु घोलप,विठ्ठल घाडग,नारायण घाडगे,पांडुरंग घाडगे,रावसाहेब तुपे,सरपंच  राम शंकरराव पानमळकर यांच्या वतीने होत आहे.
           रविवार दि.१६ जुलै रोजी सायं.४ वा.भव्य दिंडी मिरवणुक तसेच १७ जुलै रोजी स.१० ते १२ काल्याचे किर्तन व नंतर  महाप्रसाद भंडारा होणार आहे.सप्ताह मध्ये मृदुंगसम्राट किशोर गडाख,गायनाचार्य सर्वश्री वारकरी भुषण शिवाजी महाराज कापडी,चंद्रकांत डेंगळे,विकास दरवडे ,सुप्रसिध्द तबला वादक शेखर दरवडे असून साथसंगत समस्त नागरदेवळे,सावतानगर,बाराभाबळी,बुऱ्हाणनगर,कापुरवडी भजनी मंडळ आहेत तर निष्ठावंत वारकरी पुरस्कार  सुनिताताई व सुधाकर घाडगे तसेच कमलताई व पांडुरंग धाडगे हे आहेत.
       तरी सर्व भाविकांनी रोजच्या कार्यक्रमास व कीर्तनास उपस्थित राहावे असे आवाहन नागरदेवळे भजनी मंडळ व समस्थ ग्रामस्थ नागरदेवळे,ता.नगर यांनी केले आहे.
 फोटो-येथील नागरदेवळे येथे संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा निम्मित  मंदिर प्रागंणात  विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून  महाप्रसाद पंगत राहुलजी पानसरे(पं.स.सदस्य)यांनी काल दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button