निसर्ग कवी तानाजी सावळे यांना साहित्यभूषण गौरव पुरस्कार प्रदान

विलास तुपे /राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील शेलविहिरे येथील निसर्ग कवी तानाजी नाथू सावळे.. यांना नुकताच राज्यस्तरावरील अष्टपैलू साहित्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करन्यात आला
त्यांच्या प्रगतिशील विचारांच्या व निसर्ग मय कविता गायन जालिंदर आडे यांच्या आवाजात ऐकल्या की मन खरोखर मोहून जात.
.त्याच्या प्रबळ रचना पाहून व ऐकून पुणे जिल्ह्यातील संपादक श्री.संजय घोईरत सर (आंबेगाव) यांनी निसर्ग कवी तानाजी सावळे यांना उभड ( धारा आदिवासी अभिव्यक्तीची) या मासिकाचे सहसंपादक म्हणून काम करण्याची संधी दिली त्यामुळे त्यांना आदिवासी साहित्य क्षेत्राची मुख्य साहित्यवाट सापडली. विविध राज्य स्तरीय कविता स्पर्धा , लहान काव्यसमूह, मग साहित्य संमेलन अशा स्टेजवर त्यांच्या कवितांचा सन्मान केला जाऊ लागला. या नंतर प्रगतिशील लेखक संघाने त्यांना प्रथमच राज्यस्तरीय विद्रोही कविता स्पर्धेत नाशिक या ठिकाणी कविता सादर करण्याकरिता प्रोत्साहित केले, त्यामुळे त्यांची काव्य स्पूर्ती वाढली.
निसर्ग कवी तानाजी सावळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यता प्राप्त अष्टपैलू कला अकादमी मुंबई यांच्या अक्षरमंच राज्यस्तरीय स्पर्धेत गेल्या सलग ३ वर्षापासून सहभाग नोंदऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी खैरे सर यांनी स्वतः त्यांच्या कवितेच योग्य ते परीक्षण करून त्यांना हा अती महत्वाचा राज्यस्तरीय “अष्टपैलू साहित्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कारान सन्मानपूर्वक बहाल केला. आहे.
मागील वर्षी २०२२ मध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या ठिकाणी “आदिवासी बहुउद्दशीय सेवा भावी संस्था अहमदनगर ” यांनी तानाजी सावळे यांना दि.०९ऑगस्ट २०२२ जागतिक आदिवासी दिना निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून प्रोत्साहित केले. या नंतर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सखाराम डाखोरे सर.यांनी “उलगुलान साहित्य चळवळी ” यांचे fecebook पेज वर त्यांच्या कविता वाचनाचा live कार्यक्रम सादर करून त्यांना प्रोत्साहित केले. त्यावर त्यांनी महाराष्ट्र राज्यात पुणे या ठिकाणी वाचनवेल समूह राज्यस्तरीय महाकरंडक स्पर्धेत त्यांनी सिल्व्हर व गोल्ड मेडल मिळालं.
खरतर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना त्यांच्याबाल मनावर जो काही परिणाम झाला तो केवळ कादंबरीकार राकेश वानखेडे सर यांच्या विचारांच्या प्रभावानेचे, शाळेत असताना वनभोजन, रानसहली , व त्यांच्या प्रखर साहित्य विचारांची भर योग्य वयात मुलांना जे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जे वाघिणीचे दूध आहे ते आदरणीय राकेश वानखेडे सरांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना दिले. आणि शिक्षणाचा मुख्य केंद्रबिंदू मुलांना योग्य वयात दाखून देण्याचं काम आदरणीय राकेश वानखेडे सर गेल्या बऱ्याच वर्षांपासून सातत्याने करत आहेत त्यांचे सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद! तानाजी सावळे यांनी पिंपरकने उड्डाण पुलावर त्यांनी स्वहलिखित ध्वनिमुद्रित प्रेक्षेपण सामाजिक रचना सादर करून पुलाचे रखडलेल्या पुलाचे काम लवकर करायला भाग पाडले. स्वतःच्या गावातील पावसामुळे गळक्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बिकट गळकी परिस्थिती Adv . रवींद्र सावळे, Adv.सिद्धेश्वर लांघी साहेबयांच्या मदतीने सोशल मीडियाच्या मध्मातून समाज्याच्या निदर्शनास आणून दिली , त्या नंतर मनसे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर लेंडे साहेब ,श्री. सुशील कुमार चिखले साहेब व शेलविहीरे ग्रामस्थांनी मोलाचे योगदान देऊन शाळेची दुरुस्ती केली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ जालिंदर घिगे सर, ज्येष्ठ लेखक संजय दोबाडे सर, जगन्नाथ सावळे सर, कॉ.स्मिता ताई पानसरे, देवचंड महाले, बापू चंदन शिवे सर. कॉ.सुभाष सर , स्वप्नील धांडे, नितीन तळपाडे सर व हरसूल (नाशिक) भागातील व प्रगतिशील लेखक संघ, आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वेळी वेळी सहकार्य केलं आहे. आदिवासी साहित्य , दलीत साहित्य, ग्रामीण साहित्य, आंबेडकरी विचार, अशा सर्व विज्ञानवादी विचारांनी व गरीब परिस्थितीत अशिक्षित आईवडिलांच्या पोटी आर्थिक आदळ -आफट सहन करून साहित्य क्षेत्रात आदिवासी समाज्याची मान उंचावताना दिसत आहे.
