कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महापारेषण ची 3 एप्रिल ला बैठक.

मुंबई दि 25 महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या राज्यात अनेक जिल्ह्यातील कंत्राटी कांमगारांच्या विविध प्रलंबित समस्यां सोडवण्यासाठी .व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण यांना भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने पत्र देऊन बैठकीची मागणी केली होती त्या नुसार 3 एप्रिल रोजी 11 वाजता ही बैठक प्रकाश गंगा मुंबई मुख्यालयात होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले
तत्कालीन ऊर्जामंत्री .ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 9 सप्टेंबर 24 रोजी बैठक घेऊन जे इतिवृत्तांत दिले होते त्यातील महापारेषण कंपनीतील विविध पदांच्या नियमित भरती प्रक्रिये मध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना जादा 10 मार्क द्यावे व त्यांना वयाच्या 43 वर्ष वयापर्यंत नोकरीसाठी फॉर्म भरण्यास संधी उपलब्ध करून द्यावी 19 % पगार वाढ व त्याचा फरक तातडीने द्यावा असे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत.
काही ठिकाणी कंत्राटदार राष्ट्रीयकृत बँकेत वेतन देत नाहीत. वेतन चिठ्ठी व पूर्ण वेतन वेळेवर देत नाही, कामगारांना धमकावून त्याच्या वेतनातून विशिष्ट रकमा वेग वेगळ्या गैरपद्धती द्वारे परत घेतात हे बंद होऊन दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकन्यात यावे।
महापारेषण कंपनीतील भरती प्रक्रियेमध्ये शासनमान्य आय.टी.आय वायरमन ट्रेड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील महापारेषण कंपनीमध्ये विविध पदांवर नोकरी करता संविधानानुसार समान संधी उपलब्ध करावी
या सर्व प्रलंबित विषयांसाठी ही बैठक महत्वाची असल्याचे सचिन मेंगाळे यांनी सांगितले.
———–/-/——