गणेश बनकर यांनी उपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम केले -रामदास फुले

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार निलेश लंके यांच्या हस्ते बनकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल बनकर यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी त्यांचा सत्कार करून सन्मान केला. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगरसेवक किशोर डागवाले, ॲड. शारदाताई लगड, सिनेकलाकार मोहनीराज गटणे, जयश्री शिंदे, जयश्री बनकर महोत्सवाचे संयोजक ॲड. महेश शिंदे नितीन डागवाले संतोष विधाते किशोर बनकर ओंकार बनकर आदी उपस्थित होते.
गणेश बनकर यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. विविध सामाजिक संघटना व भाजप ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून ते सर्वसमान्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य करत आहे.
सामाजिक चळवळीतून गणेश बनकर पुढे आले आहेत. त्यांचे सामाजिक कार्य समाजासाठी भूषणावह आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करताना बनकर यांनी अपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन समता परिषदेचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले यांनी केले आहे .ते पुढे म्हणाले की शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी व जातीय वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून लग्न जुळविण्याचे कार्य ते करत असून, त्यांचे सामाजिक कार्य आजच्या युवकांना स्फुर्ती देणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेश बनकर नगर तालुक्यातील कामरगावचे भूमिपुत्र असून भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. ते संत सावता क्रांती परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष व क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे. सर्व जातीय वधू-वर मेळावे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, ग्राम विकासाच्या योजना, शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार सर्वसामान्यांपर्यंत करुन त्याचा लाभ मिळवून देत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या 15 वर्षापासून ते सातत्याने योगदान देत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे