आधुनिक व व्यावसायिक शेती तंत्रज्ञानाचा अंगीकार ही काळाची गरज – श्री चंद्रशेखर घुले पा.

आई. सी. ए.आर.स्थापना दिवसाच्या निमित्ताने केव्हीके, दहिगाव -ने च्या वतीने तंत्रज्ञान दिवसाचे आयोजन
नेवासा –शेती शेत्रातील विविध समस्या वाढत आहेत त्यासाठी आधुनिक व व्यावसायिक शेतीचा अंगीकार ही काळाची गरज ठरत आहे असे प्रतिपादन मा. आ. चंद्रशेखर घुले पा.यांनी केले. श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली च्या ९५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

भारतातील कृषि क्षेत्रातील सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा दिनांक १६ जुलै हा दिवस प्रत्येक वर्षी स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात्त येतो. या वर्षी दिनांक १६ ते १८ जुलै २०२३ दरम्यान तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे. याच निमित्ताने दि. १६ जुलै रोजी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे शेतकरी व ग्रामीण युवकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीनही दिवस भेट देनाऱ्या शेतकरी, महिला, युवक व कृषि विस्तारक यांचेकरिता कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन मा. आ. चंद्रशेखर घुले पा. व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून बोलतांना नेवासा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री सुरेश पाटेकर यांनी बदलत्या शेत परिस्थितीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावाच लागेल आणि तो करतांना केव्हीके दहिगाव ने चा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा हे सांगितले. श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री काकासाहेब शिंदे यांनी भागातील शेतकऱ्यांनी एकरी उसाची उत्पादकता वाढवावी व उस शेतीला शेणखत व इतर फायदांसाठी दुग्धव्यवसाय करावा व याकामी केव्हीके ची मदत घ्यावी असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्यामसुंदर कौशिक, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, यांनी केले. यावेळी त्यांनी केव्हीके दहिगाव ने द्वारे सुरु असलेल्या विविध उपक्रम व सेवा सुविधांची व सद्य स्थितीमध्ये पिकांचे व्यवस्थापन बद्दल माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांना विविध पिकांवरील कीड व रोग याबद्दल श्री माणिक लाखे, नवीन फळबाग लागवड व फळ व भाजीपाला पिकांवरील प्रमुख समस्या व त्यांचे निराकरण याबद्दल श्री नंदकिशोर दहातोंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शेवगाव बाजार समितीचे उप सभापती श्री गणेश खमरे, दहिगाव चे उपसरपंच श्री राजाभाऊ पाउलबुधे, माजी सरपंच श्री सुभाष पवार, न्यू किसान कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनीचे श्री नामदेव चेडे, कृषि विज्ञान केंद्राचे श्री नारायण निबे, इंजी राहुल पाटील, डॉ चंद्रशेखर गवळी, श्री प्रकाश बहिरट, श्री अनिल देशमुख, श्री प्रवीण देशमुख हे उपस्थित होते. यावेळी केव्हीके दहिगाव ने द्वारा आयोजित लघु सेंद्रिय उत्पादक व लघु दुग्ध उत्पादक शेतकरी प्रशिक्षनार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन बडधे यांनी तर श्री प्रकाश हिंगे यांनी आभार मानले.
