उपजिल्हाधिकारी पराग सोमण व शिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर यांचा कोतुळ येथे नागरी सत्कार
कोतुळ दि 16
अकोले तालुक्यातील कोतुळ येथिल भूमिपुत्र उपजिल्हाधिकारी पराग सोमण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत आयएएस पदावर नियुक्ती झाल्याने उप जिल्हाधिकारी पराग सुरेश सोमण यांचा तसेच कोतूळ येथील सुपुत्र गणेश फुलसूदर यांची नाशिक जिल्हा परिषदेत उपशिक्षण अधिकारी (माध्यमिक) या पदावर नियुक्ती झाल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांचा कोतुळ येथे ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे माजी संचालक व माजी सरपंच सयाजीराव देशमुख हे होते
सत्कारमूर्ती उपजिल्हाधिकारी पराग सोमण ,उपशिक्षण अधिकारी गणेश फुलसुंदर तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख, अगस्ती कारखान्याचे संचालक सयाजीराव देशमुख, कृषिमित्र सयाजीराव पोखरकर ,भाऊदाजी पाटील प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र देशमुख ,राजेंद्र पाटील देशमुख, प्रफुल्ल सोमन, घनश्याम माने, वंदना फडके ,पंडित देशमुख, मनोज देशमुख, प्रा. मच्छिंद्र देशमुख, सुरेश गीते, यांनी मनोगत व्यक्त केले
उपजिल्हाधिकारी पराग सोमण, उप शिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर यांचा यावेळी ग्रामस्थ व विविध संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला
यावेळी डॉ. एस के सोमण, सुरेश पाटील देशमुख उपसरपंच संजय देशमुख, गणेश पोखरकर, विनय समुद्र,भाऊसाहेब देशमुख, गिरीश सोमण, डॉ. किसनराव भुजबळ ,पद्माकर महाजन, रावजी दराडे, सयाजीराव देशमुख, चंद्रकांत घाटकर, शंकर घोलप, बाळासाहेब देशमुख ,अशोक बापट, सचिन गीते, विनय बोऱ्हाडे, भाऊसाहेब देशमुख , डॉ नीलिमा सोमण, शिवाजीराव देशमुख ,रामचंद्र फुलसुंदर ,संजय आरोटे निवृत्ती पोखरकर, राजेश आरोटे ,दिगंबर जाधव, महेश परदेशी, मकरंद देशपांडे ,सुभाष देशमुख, संजय देशमुख ,अमोल देशमुख, किरण देशमुख ,दीपक परशुरामी ,मकरंद देशपांडे ,वासुदेव साळुंके, डॉ प्रफुल्ल सोमाण, केशवराव देशमुख, शंकरराव देशमुख, लक्ष्मण उपासनी, लीलाबाई फुलसुंदर, केतकी सोमण, डॉ स्वाती सोमण, सौ प्रज्ञा सोमण, प्रदीप भाटे, श्रीमती विद्या सोमण, वृषाली संत ,सौ अलका बापट, नेहा कुलकर्णी ,मानसी सोमन, कौस्तुभ सोमण, ओम कुलकर्णी ,राजेंद्र बुरके, संदीप कोते संजय उकिरडे,निलेश पोखरकर, युवराज आरोटे ,मुरलीधर आरोटे ,तुकाराम आरोटे, मनोज बोऱ्हाडे ,मुकुंद बोराडे, बी के देशमुख,
ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील देशमुख यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गीते यांनी केले तर श्याम देशमुख यांनी शेवटी आभार
मानले
मायभूमीचा सत्कार हा आमच्या पुढील कामाला निश्चित प्रेरणा आणि ऊर्जा देणारा आहे सामान्य जनतेच्या सेवेसाठी आमचे काम पुढे चालू ठेऊ निवडीबद्दल अनेक सत्कार होत आहे परंतु हा घरचा सत्कार कायम आठवणीत राहील असे सत्कार मूर्ती पराग सोमण यांनी सांगितलेतर सेवा ही नेहमी लोकांसाठी कामाला आली पाहिजे ही भावना ठेऊन काम केले त्यामुळेच शालेय पोषणआहार योजनेतून नाशिक जिल्ह्यात चांगले काम करता आले यामुळेच राज्यात नाशिक जिल्हा या कामात अव्वल ठरला गावच्या सत्काराने आम्ही भारावून गेलो आहे हा सत्कार नेहमी पुढील कामात दिशादर्शक ठरले असे शिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले