इतर

सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते वडुले येथे स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

दत्ता ठुबे

पारनेर:- वडुले येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या स्मशानभूमी सुशोभीकरण करणे. (१०.०० लक्ष रू.)चे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

गेले अनेक वर्षापासून गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने गैरसोय होत असे. गावातील सरपंच व ग्रामस्थ यांनी सदर स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करणेबाबत सुजित झावरे पाटील यांच्याकडे मागणी केली. काही महिन्यात सदर स्मशानभूमी साठी जनसुविधा योजने अंतर्गत १०.०० लक्ष रू निधि मंजूर करण्यात आले व सदर कामाचे भूमिपूजन समारंभ करून कामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी सरपंच आशाताई भापकर, उपसरपंच सुषमाताई कंद, ज्येष्ठ नेते सुरेशशेठ पठारे, शिवाजी भापकर, मा.सरपंच संतोष यादव, शशिकांत भगत, दिपक इंगळे, रवींद्र पाडळकर, अमोल रासकर, राहुल ठोकळ, ग्रा. सदस्य वैशालीताई पठारे, आरती सोनवणे, स्वाती निमोनकर, संतोष गट, राजेंद्र पठारे, शहाजी खामकर, गुलाबराव भापकर, शिवाजी भापकर, कचरू भापकर, संपतराव भापकर, विजयराव पठारे, अनिल पठारे, आबासाहेब भापकर, भाऊसाहेब गट महाराज, श्रीधर गायकवाड, बाबुराव नवले, सुनिल भापकर, दादा चेडे, बी. जी. भापकर, बन्सी रोकडे, किरण धुमाळ , बापू गायकवाड, दादा भापकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button