नेप्तीत सामाजिक कार्यकर्ते भानुदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण

अहमदनगर (प्रतिनिधी)-
नगर तालुक्यातील नेप्ती येथे ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात पार पडला. आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नितीन कदम यांनी एक हजार बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
सर्व शालेय विद्यार्थ्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप केल्याबद्दल कदम यांचा ग्रामस्थांच्या वतीने मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार यांनी सत्कार केला. माळगल्लीतील सावता महाराज मंदिर परिसरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर केला. झेंड्या भोवती सडा, रांगोळी टाकून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. नेप्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. भारत मातेच्या जय घोषणांनी गावाचा परिसर दणाणून गेला होता. सावता महाराज मंदिराच्या पटांगणात सामाजिक कार्यकर्ते भानुदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सविता संजय जपकर यांच्या हस्ते, श्रीराम मंदिरासमोर माजी सरपंच दिलीप होळकर यांच्या हस्ते, नेप्ती विद्यालयात सरपंच सविता जपकर व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपसरपंच संजय जपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थी व ग्रामस्थांची भाषणे झाली. ग्रामस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अंबादास पुंड, माजी उपसरपंच शिवाजी होळकर, संजय जपकर, फारुख सय्यद, जालिंदर शिंदे, संतोष बेल्हेकर, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख विनायक बेल्हेकर, पोलीस पाटील अरुण होले, माजी सैनिक बापूसाहेब साळवे, ग्रामपंचायत सदस्य दादू चौगुले, लक्ष्मण कांडेकर, बंडू जपकर, सत्तार सय्यद, जावेद सय्यद ,जमीर सय्यद, पाराजी होळकर, नानासाहेब बेल्हेकर, वसंत कदम, शशी होळकर, सुरेश कदम, रामदास कल्हापुरे, आसिफ सय्यद, दत्ता कांडेकर, साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, बाबासाहेब भोर, राजेंद्र झावरे, एकनाथ होले, मुख्याध्यापक सुरेश कार्ले, महेश जाधव, तलाठी सोमनाथ गलांडे, सुभाष नेमाने, ग्रामसेवक लालाभाई शेख, धोंडीभाऊ नरवडे, रफिक सय्यद आदींसह ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.