पवार कुटुंबीयांकडून कातळापुर विदयालयास शैक्षणिक साहित्यांचे वाटप!

अकोले /प्रतिनिधी –
फुलांना देठाचा आधार,देठाला फांदीचा आधार,फांदीला खोडाचा आधार,खोडाला मुळांचा आधार,मुळांना भूमिचा आधार,भूमिला निसर्गाचा आधार,याच निसर्ग नियमाच्या संकल्पनावर आधारित मानवी जीवनाची वाटचाल सुरू असते. हाच उदात्त हेतु समोर ठेवून पवार कुटुंबीयांनी विदयार्थ्यांना दिलेला शैक्षणिक साहित्यांचा आधार प्रेरणादायी असल्याचे विचार जेष्ठ साहित्यिक डॉ.संतोष पाठारे यांनी प्रतिपादीत केले.
अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेच्या नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर कातळापुर येथे पवार कुटुंबीयांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.पाठारे प्रमुख अतिथि म्हणून व्यासपिठावरून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन.कानवडे हे होते.यावेळी आरती पाठारे,विजय पवार,महेंद्र पवार,आशा पवार,रेश्मा पवार,अक्षय पवार,रूचिका पवार,मोनाली पवार,रोहित पवार,संस्थेचे संचालक मिलिंद उमराणी,प्रकाश टाकळकर,विजय पवार,रामजी काठे,सरपंच बाळासाहेब ढगे,दत्तु सुर्यवंशी,मधुकर पटेकर,माजी प्राचार्य लहानु पर्बत,अधिक्षक वाळू धिंदळे,मुख्याध्यापक बादशहा ताजणे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.
डॉ.पाठारे यांनी पुढे बोलताना स्वभाव हा उपजतच नसतो,तो घडवावा लागतो,स्वभाव माणसाला घडवतो. त्यासाठी एकमेकांना विश्वास दया. तेव्हाच काहीतरी घडत असते.असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष टि.एन.कानवडे यांनी जीवनातील सर्वात मोठे अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचने आहे.त्यासाठी इतरांमधील चांगुलपणा शोधा.यशस्वी होण्यासाठी माणसे जोडावी लागतात. असे विचार व्यक्त करत पवार कुटुंबीयांचे कौतुक केले.
महेंद्र पवार,विजय पवार,सरपंच बाळासाहेब ढगे,पालक मधुकर पटेकर,माजी विदयार्थी गौरव रोकडे आदींनी शाळा,गाव,आई,वडील यांचे नाव रोशन करा.जिवनात खुप मोठे व्हा,आयुष्यात पुढे जाताना कधीतरी मागे वळुन पहा.असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक बादशहा ताजणे यांनी केले. अध्यक्षीय सुचना संपत धुमाळ यांनी मांडली. तर किशोर देशमुख यांनी अनुमोदन दिले.
सुत्रसंचलन अनिल पवार,गोरक्ष मालुंजकर यांनी केले. तर धनंजय मोहुंडुळे यांनी आभार मानले.
