मलेका शेख नॅशनल गोल्डन अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

संगमनेर प्रतिनिधी
जादुगार पी. बी. हांडे सोशल फौंडेशन महाराष्ट्र
सामजिक विभागाच्या वतीने लोकसारथी पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रीय नॅशनल गोल्डन अवार्ड पुरस्काराने नामवंत कवयित्री मलेका शेख सैय्यद यांना शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, लिज्जत पापडचे सुरेश कोते,ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, नामवंत जादूगार पी.बी.हांडे , डॉ.शांताराम कारंडे यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. या राष्ट्रीय पुरस्कारा स सन्मान चिन्ह प्रमाणपत्र शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
समाजातील सामाजिक कार्यकर्ते ,राज्यांच्या व देशाच्या उन्नतीसाठी विविध क्षेत्रात योगदान असणाऱ्या, मान्यवरांना पुरस्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
श्रीमती मलेका शेख या माध्यमिक शिक्षक असून त्यांनी मुबलक साहित्य लेखन केले आहे.
‘मानसमेघ’,अमन’आयाम’ काव्यसंग्रह,’उमेद’ चारोळी संग्रह प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या कविता लेख प्रकाशित झाले आहे. आजवरच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना
लोककवी वामनदादा कर्डक आदर्श शिक्षिका ,ग्रामीण साहित्य संमेलन सन्मान ,छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार,गोवर्धन पतसंस्थेतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, सिन्नर तालुका ग्रामीण साहित्य संमेलन सन्मान ,आदर्श क्रीडा शिक्षिका पुरस्कार ,वूमन ऑफ द इयर पुरस्कार,लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मान, आदर्श क्रीडा शिक्षिका सन्मान ,ज्ञानज्योती फातिमाबी शेख पहिले साहित्य संमेलन,९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात करण्यात आले आहे.
त्याचबरोबर वृक्षारोपण ,अ़ंधश्रध्दा निर्मुलन,साक्षरता प्रसार,एड्स जनजागृती,अंधनिधी, कारगिलनिधी,ध्वजनिधी,भूकंपनिधी जमविणे,सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवणे,हुंडाबळी विविध सामाजिक प्रश्नावर त्यांनी लेखन केले आहे.कविसंमेलनातून प्रबोधन,ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गाव स्वच्छ करणे,अनेक शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा उपक्रमात सहभाग नोंदविला आहे त्यांच्या या कर्तुत्वाबद्दल त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत.