शिंगवे तुकाई येथे पीक व्यवस्थापन चर्चासत्र

दत्तात्रय शिंदे/माका प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न असलेल्या कृषि महाविद्यालय, सोनई व कृषि विभाग महाराष्ट्र शासन तर्फे दि.२५ जुलै रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या वेळी कृषि महाविद्यालय सोनईचे उपप्राचार्य प्रा.डॉ. सुनिल बोरुडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.अतुल दरंदले, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण हुरळे, मृदा विज्ञान विभागाचे प्रा.जयसिंग वाघमारे, फलोत्पादन विभागाचे प्रा.सोमनाथ तागड तसेच गावचे माजी सरपंच योगेश होंडे, कृषि सहाय्यक श्री.अनिल साळुंके,माजी कृषि सहाय्यक श्री.डी जी दरंदले, प्रगतशील शेतकरी श्री. शरद पवार भाऊसाहेब धायबर, वसंत धायबर आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण कृषि जागरूकता कार्यक्रम अंतर्गत झालेल्या सत्रात डॉ.बोरुडे सरांनी प्रस्तावना मांडली यांनी महाविद्यालयामध्ये चालत असलेल्या विविध प्रकल्पांची जसे माती परीक्षण साठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा, जिवाणू खते प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका, यांची माहिती दिली व महाविद्यालयात भेट देण्याच्या आवाहन केले. प्रा.जयसिंग वाघमारे मृदाशास्त्र विभाग यांनी माती परीक्षण का गरजेचे आहे, पीक उत्पादन वाढीत असणारी मातीची भूमिका, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, जमिनीचा पोत कसा सुधारावा, जमिनीतील अन्य द्रव्य या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर प्रा.डॉ. हुरुळे यांनी संत्रा पिकावरील डिंक्या, सिट्रस ग्रीनिंग, डाळिंबावरील मर, तेल्या रोगाचे

एकात्मिक व्यवस्थापन आणि पिकांचे होणारे आर्थिक नुकसान कसे टाळावे, पावसाळ्यात रोगांचे नियंत्रण कसे करावे या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषि सहाय्यक श्री.साळुंके यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि रोजगार हमी योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, प्रा.डॉ.अतुल दरंदले यांनी उपस्थिती शेतकऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालय सोनईच्या कृषिदुत, अथर्व दांगट, रितेश चव्हाण, ऋतिक जाधव, स्वप्निल लोंढे, ओम घनवट यांनी परिश्रम घेतले. शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात या मार्गदर्शन पर चर्चासत्रास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांनी त्यांचे प्रश्न यादरम्यान उपस्थित केले शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या वेळी देण्यात आली.