अकोल्यात बनावट दारू निर्मिती उद्योगाचा पर्दाफाश मद्य शौकिनामध्ये खळबळ!

सुनील गिते
अकोले दि 30
, राज्य उत्पादन शुल्क व अकोले पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आज पहाटे केलेल्या छापा कारवाईत अकोल्यातील मद्यविक्रीचे अधिकृत केंद्र असलेल्या बालाजी वाईन्स या दुकानात बनावट दारू निर्मितीच्या उद्योगाचा पर्दाफाश करण्यात आला
नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करुन बनावट विदेशी मद्याची निर्मिती केली जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चौघा परप्रांतीय आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 10 हजार 500 रुपयांचे बनावट दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले
नाशिक विभागाचे विशेष महानिरीक्षक बी. जी. शेखर यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या विशेष पथकाला अकोले पोलिसांच्या मदतीने छापा घालून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे आज (ता.30) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास या संयुक्त पथकाने अकोले शहरातील खटपटनाका चौकात असलेल्या ‘बालाजी वाईन्स’ या शासनमान्य मद्यविक्री दुकानावर छापा टाकला . यावेळी दुकानात चौघे परप्रांतीय नामांकित कंपनीच्या रिकाम्या मद्य बाटल्यांमध्ये बनावट मिश्रण केलेले मद्य भरीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले
पथकाने या दुकानाच्या आत प्रवेश करुन पाहणी केली असता वेगवेगळ्या कंपनीच्या रिकाम्या व भरलेल्या बाटल्यांचा खच दिसून आला त्याला सिलबंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुचासह( झाकण )अन्य सामग्री व मिश्रणातून तयार केलेले मुबलक प्रमाणातील मद्य पोलिसांच्या हाती लागले. यावेळी पथकाने बालाजी वाईन्स या दुकानातून 146 मद्याच्या रिकाम्या बाटल्या, बाटल्या हुबेहुब सिल करण्यासाठी आवश्यक असलेले 265 पत्र्याचे बुच, 14 ऑफीसर चॉईस मद्याच्या भरलेल्या बाटल्या, ऑफिसर चॉईस, ब्लू, रॉयल स्टॅग व मॅकडॉल्ड कंपनीची हुबेहुब बाटल्यांची बुचे, एक लिटर देशी दारु असलेल्या बारा बाटल्या. चिकटविण्याचा टेप, नरसाळे, गाळणी अशा अन्य साहित्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सविस्तर पंचनामा करुन ते ताब्यात घेतले.
अकोले शहरातील खटपट नाका चौकात असलेल्या बालाजी वाईन्समध्ये अशा प्रकारे नामांकित कंपन्यांचे बनावट मद्य तयार करुन ग्राहकांची फसवणूक करणार्या या दुकानाचा व्यवस्थापक महेश लिंगय्या हिरेचगिरी, सदरचा बनावट माल तयार करणारा साईकिरण बल्यागडम व प्रशांत गौड मुंजा आणि शंकर अंजगैर वन्हेला (सर्व रा.तेलंगणा, ह.मु.अकोले) हे दोन कामगार अशा एकूण चार जणांना पहाटेच ताब्यात घेण्यात आले.
याबाबत अकोले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आज सकाळी त्या चौघांनाही संगमनेरच्या उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या हवाली करण्यात आले आहे.
अकोल्यातील बाजार पेठेत हे मद्य विक्री दुकान असल्याने या दुकानात नेहमीच मद्यशौकीनांची मोठी गर्दी असते.जास्त मागणी असणाऱ्या दारूची बनावट दारू तयार करून ती ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार असल्याचे समोर आले आहे
ऑफिसर चॉईस या कंपनीच्या नावाचा वापर करण्यात आला. दुकानात सापडलेली बारा लिटर देशी दारु भेसळीसाठीच वापरली असल्याचाही संशय असून उत्पादन शुल्क विभाग त्यादृष्टीनेही तपास करीत आहे. अकोल्यातील हा जुना मद्य विक्रेता आहे बनावट दारू विक्रीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे या रॅकेटने अकोले तालुक्यातील खेडोपाड्या पर्यंत बनावट दारू पोहचविली असून या बनावट दारूने अनेकांचे बळी घेतले तर अनेकांच्या किडन्या लिव्हर निकांमी केले आहे कोरोना काळात मोठया प्रमाणात ही बनावट दारू तालुक्यात पसरली अनेक वेळा तक्रारी करून ही दखल घेतली जात नव्हती राज्य उत्पादन विभागाच्या संगमनेर च्या कार्यालयाला मोठा आर्थिक मलिदा नियमित मिळत असल्याचे अनेक दिवसांपासून राजरोस हा प्रकार सुरू होता असे बोलले जात आहे या प्रकाराला पाठीशी घालणारे संगमनेर चे उत्पादन शुल्क निरीक्षक यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे
शासनाकडून मद्यविक्रीचा अधिकृत परवाना प्राप्त झालेल्या बालाजी वाईन्स या दुकानातून हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सदरचा परवाना जारी करताना जिल्हाधिकार्यांनी घातलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघनही या कृत्यातून झाले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल होणार्या तक्रारीनंतर त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविला जाणार असून त्यातून दंडात्मक, सील अथवा परवाना निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

मिथून घुगे
सहाय्यक पोलीस निरीक्षक ,अकोले