काकणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक योगा दिन उत्साहात साजरा-

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील काकणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक योगा दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब खराबी यांनी जागतिक योगा दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण जगाला योगाचे महत्व सात वर्षापुर्वी पटवून दिले होते. त्यानंतर 21 जून हा दिवस हा योगादिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.
मुख्याध्यापक बाळासाहेब खराबी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शरीर, मन व आत्मा यांना जोडणारे विज्ञान म्हणजे योग होय. या योगा मुळे संपूर्ण शरीराच्या व्याधी बऱ्या होतात. विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय योगाचे महत्व आत्मसात करण्यास सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका अलका खोडदे,ज्योती कर्डीले, वनिता सुंबे यांनी परिश्रम घेतले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण समितीचे अध्यक्ष अर्जुन वाळुंज यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.