संघटित व असंघीटत क्षेत्रातील कामगारांसाठी संघर्ष करणार. भारतीय मजदूर संघ

पुणे -मागील काही वर्षांपासून सरकारने विविध कारणे दाखवून, सरकारी ऊद्योगांचे खाजगीकरण, काॅपेशेशन निर्माण करून कामगारांनी लढाई करून मिळविलेले कायदे, सेवा शर्ती चा एकतर्फीपणे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे . तसेच संरक्षण, विमा, वीज, रेल्वे , सरकारी ऊद्योगातील कामगारांचे देशाच्या आर्थिक विकासाचा मध्ये महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे . असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या विविध समस्या , लाभांच्या योजना सरकार दरबारी प्रलंबितच आहेत. त्यामुळे संघटीत, असंघीटत क्षेत्रातील कामगारांनी एकत्रित येवुन अधिक संघर्षशील होण्याची आवश्यकता आहे. कामगारांनी एकत्रित येवुन कामगार क्षेत्रातील आव्हानांचा मुकाबला करावा असे आवहान भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री संजय मेनकुदळे भारतीय मजदूर संघाच्या 68 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा च्या कामगार मेळावा मध्ये केले आहे.
या निमित्ताने भारतीय मजदूर संघाच्या विश्वकर्मा भवन शनिवार पेठ पुणे येथील नुतनीकरण कार्यालयाच्या लोकार्पण सोहळा जेष्ठ मार्गदर्शक, श्री बाळासाहेब फडणवीस, पुर्व महामंत्री श्री उदय पटवर्धन, जेष्ठ मार्गदर्शक मुकुंद गोरे, संजय सफई, अनिल फौजदार, भारतीय मजदूर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येणूरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

या प्रसंगी भामसंघ् प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे म्हणाले की गेल्या 68 वर्षा मध्ये कामगारांच्या चळवळीत त्याग तपस्या व बलिदान दिले आहे. भारतीय मजदूर संघाचे महत्वपूर्ण योगदान म्हणजे सर्वसामान्य श्रमिकांना माणूस म्हणून किंमत समाजात मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान आहे.
या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या कामगार संदेश या डिजिटल मासिकाचे विमोचन श्री बाळासाहेब फडणवीस यांनी केले आहे कंत्राटी कामगार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी, मागील वर्षी तील महत्वपूर्ण घटनां चा कार्य अवहाल जिल्हा सचिव श्री बाळासाहेब भुजबळ, अध्यक्षीय समारोप, आभार पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण यांनी केले, मानवता् के लिये श्रमीक गीत जालिंदर कांबळे यांच्या गिता ने सुरवात व वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मेळावा यशस्वीपणे करण्यासाठी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा पदाधिकारी, उमेश विस्वाद, विवेक ठकार, राहूल बोडके , उमेश आणेराव, वंदना कामठे, निखिल टेकवडे, प्रवीण निगडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
