ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी शिबीर संपन्न.

अकोले/प्रतिनिधी-
राजूर येथील ॲड. एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण विभाग, निवडणूक साक्षरता मंडळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र व तहसील कार्यालय अकोले यांचे संयुक्त विद्यमाने ” नवीन मतदार नोंदणी शिबीर “नायब तहसीलदार दत्तात्रय वाघ, राजुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे तसेच सत्यनिकेतन संस्थेचे पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
“भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी सक्षम लोकशाही असून ही लोकशाही टिकवून ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे.” असे प्रतिपादन नायब तहसीलदार दत्तात्रय वाघ यांनी केले.याप्रसंगी त्यांच्या हस्ते करियर कट्टा विभागाच्या नाम फलकाचे अनावरण देखील करण्यात आले व नवीन मतदार नोंदणी संबंधी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.” प्रत्येक तरूणांने मतदार होण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून आपला मतदानाचा हक्क बजवावा ” असे विचार राजूर पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख म्हणाले की, “आजचा तरुण हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. तरुणाची शक्ती विधायक मार्गाने वळविल्यास भारत हा देश जागतिक महासत्ताक देश होऊ शकेल.यासाठी विवेकपूर्ण मतदार बनण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तरुणांना प्रबोधन करावे लागेल “या शिबीर प्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक एस.टी. येलमामे,श्रीराम पन्हाळे यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते.या शिबीर प्रसंगी अकोले तहसील कार्यालयाचे सर्कल आव्हाड साहेब, राजूर चे सर्कल भोजने मँडम तसेच राजूर गावचे तलाठी अजय साळवे ,शेणितचे जी.व्ही.बारामते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात विद्यार्थ्यांची नवीन मतदार नोंदणी करून घेण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ. एल.बी.काकडे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. व्ही.एन.गिते यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.थोरात प्रा.डॉ.आर.आर.सोनवणे, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ. व्ही.एन.गिते,राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा.आर .सी.मुठे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे एन.एस.एस.प्रमुख प्रा.बी.एच.तेलोरे,प्रा.एन.यू.देशमुख, प्रा.आवारी सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.