रत्नागिरी येथे कोकण विभागातील नगर परिषद नगर पंचायत कामगार, कर्मचारी मेळावा संपन्न

रत्नागिरी- आज दि. २९ जुलै २०२३ रोजी रत्नागिरी येथे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन (संलग्न हिद मजदूर सभा) कोकण विभागातील नगर परिषद नगर पंचायत कामगार, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी
यांच्याभव्य कामगार मेळाव्याचे उद्घाटन मा.ना.उदयजी सांमत उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड सुरेश ठाकूर जेष्ठ कामगार नेते प्रमुख मार्गदर्शक श्री सतोष पवार कार्याध्यक्ष , श्री अनिल जाधव सरचिटणीस, श्री तूशार बाबर , मुख्याधिकारी, रत्नागिरी न. प. , श्री पांडूरग नाटेकर जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग, श्री राकेश पाटील जिल्हाध्यक्ष रायगड, देवीदास आडारकर सिंधुदुर्ग, भूषण काबाडी, पालघर, दिलिप सोनावणे रायगड,रविंद्र आयनोडकर व ईतर स्थानिक नेते उपस्थित होते

या मेळाव्याच्या सुरुवातीला संघटनेच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष पदी मकरंद पावसकर आणि जितेन्द्र विचारे यांची नियुक्ती रत्नागिरी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष म्हणून झाली तसेच त्यांचे कोविड कालावधीतील महत्वपूर्ण कामगिरी बद्दल यांचा सत्कार रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
या मेळाव्याचे प्रास्ताविक कामगार नेते संतोष पवार यांनी केले संघटनेचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर आणि संघटनेचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी मंत्रीमहोदयांसमोर राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील कामगार कर्मचार्यांचे प्रदिर्घ काळापासून प्रलंबित प्रश्नांची मांडणी केली यावर प्रतिसाद म्हणून मेळाव्याचे उद्घाटक उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी नगरपरीषद आणि नगरपंचायतीमधील कामगार, कर्मचारी, कंत्राटी कामगार, उच्चशिक्षित वर्ग ३-४ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी होणार्या परिक्षा , अभ्यासक्रम, सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी मिळाली पाहिजे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालेच पाहिजे, १०:२०:३० अश्वासित प्रगती योजना, श्रमसाफल्य घरकुल योजना, नगर परिषद , नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन ट्रेझरी मधूनच झाले पाहिजे या विषयांबाबत सकारात्मक विचार मांडले आणि या सर्व मागण्यांपूर्ण करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या समवेत या आठवड्यात बैठक आयोजित करून ज्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय झाले आहेत ते शासनामार्फत मार्गी लावले जातील असेही आश्वासन उपस्थित नगरपरीषद आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मकरंद पावसकर, नवनिर्वाचीत रत्नागिरी नगरपरीषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र विचारे आणि त्याचे सर्व कार्यकारिणी सदस्य कामगार, कर्मचारी यांच्या मेहनतीने शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
