गणराज इस्पात कंपनीवर त्वरित कारवाई करावी….. मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर आक्रमक

दत्ता ठुबे
पारनेर:-गणराज इस्पात या कंपनीच्या घातक धुराबाबत आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत कुठलीही त्यावर कारवाई झालेली नाही. गणराज कंपनी ही रात्री पहाटे घातक धूर सोडते आणि त्या धुराची तीव्रता एवढी असते की तेथील येणारे जाणारे प्रवासी उद्योगधंदे तेथील शेती यांच्यावर घातक परिणाम होतो.
सदर कंपनी ही कुठे आऊट साईडला असावी येथे रोडला नसावी कारण तिथे आसपास शेती आहे आणि रस्त्याने येणारे जाणारे प्रवासी यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो आणि तिथे शेती जमीन ही नापीक झालेली आहे. त्याच्या बाजूला पेट्रोल पंप,हायस्कूल, उद्योगधंदे आणि व्यवसायिक आहेत. त्या धुराचे खूप पुरावे आहेत. सदर कंपनी ही रस्त्यापासून लांब हलवण्यात यावी आणि त्या कंपनीला धुराची मर्यादा ठेवावी.
जर या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मुंबईला आझाद मैदान येथे शेतकऱ्यांना व व्यवसायिकांना घेऊन आमरण उपोषणाला बसणार आहे यानंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचे निवेदन मनसे तालूका उपाध्यक्ष रवीश रासकर यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी सी एन शिंदे यांना दिले.