जिल्हा परिषद काळेगाव शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भातकुडगावफाट्या पासून हाकेच्या अंतरावर राजमार्गावरील असणाऱ्या पुनर्वशीत काळेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक संदीप आहेर सहशिक्षक लक्ष्मण पिंगळे भायगावचे पोलीस पाटील बबनराव सौदागर, उषा सौदागर यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊंच्या व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी अण्णाभाऊंच्या व लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग बाल मनाला भावतील अशा शब्दात मार्गदर्शन केले. यावेळी शालेय उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांचे संकलन करून या शालेय उपक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. यामध्ये चैतन्य शेकडे, पृथ्वीराज सौदागर, भक्ती लांडे, आर्यन आढाव, प्रिया पालवे, कृष्णा शिरसाट, श्रावणी पेठे, चैतन्य आगळे, श्रावणी दुकळे,दिव्या लोखंडे, श्रुती सौदागर, समर्थ लांडे, आदित्य काळे, साई पिंगळे, समृद्धी सौदागर, वाहिद सय्यद, ऋषिकेश काळे, श्रावणी शेकडे, वेदांती शेकडे त्यांच्यासह आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

शेवगाव तालुक्यापासून १४ किलोमीटर अंतरावर शेवगाव – नेवासा राज मार्गावरीलपैठण जलाशयाने विस्थापित झालेल्या पुनर्वसित काळेगाव जिल्हा परिषद शाळा सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आकर्षण बनत आहे. चार ते पाच किलोमीटर अंतरापासून या शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी येऊन अध्ययन करताना दिसत आहे.या शाळेतील येण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा तिथे काम करत असलेल्या शिक्षकांच्या काष्टाची पावती मिळत आहे.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गुणवत्ता पाहून शाळेतील शिक्षक करत असलेल्या या कामाचे पालकांसह ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.